पोस्ट ऑफिस, पोस्टमनच्या माध्यमातून मिळणार जनधन’चे पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Get Money Into Jan Dhan Through Post Office, Postman

ज्या खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे अशा खात्यावरील रक्कम पोस्टमन व पोस्ट बँकेच्या माध्यमातून काढता येणार आहे. याची सुरवातही आजपासूनच करण्यात आली आहे. 

पोस्ट ऑफिस, पोस्टमनच्या माध्यमातून मिळणार जनधन’चे पैसे

औरंगाबाद : महिलांच्या जनधन बचत खात्यात जमा झालेले पाचशे रुपये सानुग्रह अनुदान काढण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी करण्यात येत आहे. ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आता हे पैसे भारतीय पोस्ट बँक व पोस्टमनच्या माध्यमातून लाभधारकांना घरपोच मिळणार आहेत. सोमवारपासून (ता.१३) ही सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली. 

जिल्ह्यात महिलांच्या जनधन बचत खात्यांची संख्या पाच लाख ३५ हजार आहे. या खात्यांमध्ये केंद्र सरकारतर्फे २६ कोटी ७५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी जिल्हा अग्रणी बँक व जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत जनधन बचत खात्यातील पाचशे रुपये हे पोस्ट त्याच्या कोणत्याही शाखेमधून किंवा पोस्टमनच्या माध्यमातून ग्राहक काढू शकतो, असे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी संबंधित बँकांना दिले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ज्या खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे अशा खात्यावरील रक्कम पोस्टमन व पोस्ट बँकेच्या माध्यमातून काढता येणार आहे. याची सुरवातही आजपासूनच करण्यात आली आहे. 
महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता इतर सर्व बँकांतील खातेधारक यांच्या खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे, अशा ग्राहकांनी आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयातून पोस्ट बँकेच्या माध्यमातून पैसे काढावेत. शहरात १४ पोस्ट कार्यालयांच्या शाखा आहेत. जिल्ह्यात २९२ पोस्ट ऑफिसेस आहेत. असे एकूण ४३२ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्राहक आपले पैसे काढू शकतात. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा    

व्यवहार करण्यासाठी..
व्यवहार करण्यासाठी खातेदाराला त्यांच्या आधार क्रमांक, बँक पासबुक व आधार लिंक असलेला मोबाईल सोबत घ्यावा लागेल. त्यावर आलेला ओटीपी पोस्टमनला संपर्क साधून द्यावा. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्टेशन रोडवरील शाखेमधून पोस्ट बँकेतर्फे या सुविधेचा प्रारंभ झाला आहे, असेही श्रीकांत कारेगावकर यांनी सांगितले. 

‘सकाळ’च्या वृत्ताची दखल 
बँकांत होणाऱ्या गर्दीविषयी ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला. यासह ‘आधार क्रमांकावरून काढा पैसे’ असे वृत्त देत भारतीय पोस्ट बँकांमधून जनधनचे पैसेही काढता येतील, असे सुचविले होते. याची जिल्हा प्रशासनातर्फे दखल घेण्यात आली. 

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BankIndia
loading image
go to top