एक रुपयांच्या मासिक खर्चात मिळवा 2 लाखांचे सुरक्षा कव्हर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pmsby

एक रुपयांच्या मासिक खर्चात मिळवा 2 लाखांचे सुरक्षा कव्हर

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : केंद्र सरकारकडून सामाजिक सुरक्षेसाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत. ज्यांना महागड्या विमा पॉलिसी खरेदी करणे परवडत नाही, अशा घटकांना विमा संरक्षणाच्या कक्षेत आणणे हा योजनेमागील उद्देश आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY)मध्ये अतिशय साधारण प्रिमियमवर 2 लाख रुपयांचा अपघाती कव्हर मिळतो. या स्किमची खासियत अशी की वर्षात एकदाच याचा प्रिमियम द्यावा लागतो आणि तोही तुमच्या बँक खात्यातून ऑटो डिडक्ट होतो. (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana scheme)

PMSBY: प्रिमियम 1 रुपये आहे महिन्याचा खर्च

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) वार्षिक प्रिमियम केवळ 12 रुपये आहे. याचा अर्थ की तुम्हाला दर महिन्याला फक्त 1 रुपयाची बचत करायची आहे. यात दरवर्षी 31 मेच्या आधी तुमच्या बँक खात्यातून प्रिमियमची रकक्म ऑटो डिडक्टा होईल. यात कव्हर 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी मिळतो.

PMSBY: कधी आणि किती मिळतो कव्हर

वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत (PMSBY) विमा काढलेल्या व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास किंवा पुर्ण अपंगत्व आल्यास 2 लाखांचा विमा मिळतो. तर कायमचे पण अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाखांचे कव्हर मिळेल. 18 ते 70 वर्ष वयापर्यंतचे भारतीय या स्कीलममध्ये नाव नोंदवू शकतात.

PMSBY: कसे करायचे रजिस्ट्रे शन

सरकारच्या या स्कीरममध्ये रजिस्ट्रे शन करणे अत्यंत सोपे आहे. तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल, शिवाय बँक मि‍त्राची मदतही घेऊ शकता. किंवा विमा एजंटशीही संपर्क साधू शकता. सरकारी विमा कंपन्या आणि अनेक खासगी विमा कंपन्या बँकांसोबत ही स्कीतम ऑफर करत आहे. या स्कीममची माहिती www.financialservices.gov.in या वेबसाईटवर मिळेल.

PMSBY: स्की ममधील खास गोष्टी

  • 18 ते 70 वर्षांचे कोणीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

  • विमाधारक व्यक्ती 70 वर्षांची झाल्यास हा विमा कव्हर संपेल

  • या योजनेसाठी तुमचे बँक खाते असणे गरजेचे

  • प्रिमियम कट होताना खात्यात शिल्लक (Balance) असणे अनिवार्य

  • शिल्लक (Balance) नसल्यास पॉलिसी रद्द होणार

  • बँक खाते बंद झाल्यासही पॉलिसी रद्द होईल.

टॅग्स :Arthavishwa