‘कायगर’ विरुद्ध ‘मॅग्नाईट’

प्रणीत पवार
Thursday, 4 February 2021

‘रेनॉ’ मोटार कंपनीने २८ डिसेंबर २०२०ला ‘कायगर’ ही बी-एसयूव्ही प्रकारातील कार सर्वप्रथम भारतात लाँच केली. कायगरचे डिझाईन आणि निर्मिती भारतातच करण्यात आली आहे.

सध्या स्पोर्टिव्ह लुक आणि तितक्याच दमदार, स्मार्ट फीचर्स असणाऱ्या कार्सना भारतीय बाजारात पसंती आहे. ‘रेनॉ’ मोटार कंपनीने २८ डिसेंबर २०२०ला ‘कायगर’ ही बी-एसयूव्ही प्रकारातील कार सर्वप्रथम भारतात लाँच केली. कायगरचे डिझाईन आणि निर्मिती भारतातच करण्यात आली आहे. रेनॉच्या डस्टर, क्विड आणि ट्रायबरप्रमाणे ‘कायगर’ही गतिमानतेची व्याख्या बदलणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे, तर निसान कंपनीनेही मॅग्नाईट  ही बी-एसयूव्ही प्रकारातीलच कार २०२०च्या अखेरीस लाँच केली. लॉकडाऊननंतर उभारी घेणाऱ्या भारताच्या वाहन बाजारपेठेत मॅग्नाईटसमोर ‘कायगर’ गेमचेंजर ठरणार का, याची उत्सुकता असेल.

रेनॉ कायगर 
किंमत, इंजिन

५ सीटर कार. किंमत : ५ ते ९ लाखांपर्यंत. 
इंजिन नवीन टर्बोचार्ज १.० लिटर पेट्रोल (७२ पीएस पॉवर, ९२ एनएम टॉर्क) आणि १.० लिटर नॅचरल एस्पिरेटेड (१०० पीएस पॉवर, १६० एनएम टॉर्क) या इंधन प्रकारात उपलब्ध असणार आहे. 
लांबी ३.९१ मीटर, रुंदी १.७६ मीटर, उंची १.६० मीटर, व्हीलबेस २.५ मीटर, तर २०५ मिलिमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स.

वैशिष्ट्ये
आकर्षक डिझाईन, कार्गोची सुविधा, लांबलचक व्हिलबेस देण्यात आले आहेत. आतमध्ये ड्युअल टोन केबिनसोबत आरामदायी प्रवासासाठी एक्स्ट्रा कम्फर्ट असलेले सिट्स आणि डोअर पॅड्सवर फॅब्रिक गादी देण्यात आली आहे. 
७ इंची इन्फोटेन्मेंट सिस्टम, पूर्ण काळ्या रंगातील डॅशबोर्ड आणि फूल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच ऑटो एसी, वायरलेस चार्जिंग, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप यांसारखे फिचर्स दिले आहेत.
ग्रीलचे डिझाइन रेनॉच्या इतर कारसारखे आहे. यात स्लिक एलईडी हेडलॅम्प आणि आईस क्यूब फॉग लॅम्प्ससाठी वेगळे बनवले आहेत. फंक्शनल रूफ रेल्स, १६ इंचाचे अॅलॉय व्हील्स, पाठीमागील बाजूस रूफ माऊंटेड स्पॉइलर आणि स्लिप्ट सी-शेप टेललॅम्प.
४०५ लिटरचा बूट स्पेस, केबिनमध्ये २९ लिटरचा स्टोअरेज स्पेस, तर ५ स्पीड मॅन्युअल, ५ स्पीड ऑटोमॅटिक आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय. ईको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स हे मोड.

निसान मॅग्नाईट
किंमत, इंजिन

किंमत ५.४९ लाखांपासून. टॉप मॉडेलची किंमत ९.९७ लाख रुपये. एक्सई (बेसिक मॉडेल), एक्सएल, एक्सव्ही, एक्सव्ही प्रीमिअम आणि एक्सव्ही प्रीमिअम (ओ) या आदी २० व्हेरिएंटमध्ये उपलब्ध.  
इंजिन १.० लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (७२ पीएस पॉवर, ९६ एनएम टॉर्क) आणि १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन (१०० पीएस पॉवर, १६० एनएम टॉर्क). ऑटोमेटिक गिअरबॉक्स (१०० पीएस पॉवर, १५२ एनएम टॉर्क). 
लांबी ३.९४ मीटर, रुंदी १.७५ मीटर, उंची १.५७ मीटर, व्हिलबेस २.५ मीटर ग्राऊंड क्लिअरन्स २०५ मिलिमीटर. 

वैशिष्ट्ये
एअर प्युरीफायर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, एम्बिएंट लायटिंग, क्रूझ कंट्रोल, ३६० डिग्री कॅमेरा आणि ८.० इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम (अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले कनेक्टिविटी). 
कारमधील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एयरबॅग, रिअर पार्किंग सेंसर, ईबीडीसह एबीएस कंट्रोल, हिल लॉन्च कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल.
चार ड्युअल टोन आणि चार मोनोटोन पेंट स्किम्समध्ये उपलब्ध आहे. 
अराऊंड व्ह्यू मॉनिटर (AVM) आणि फुल ७ इंचाचा टीएफटी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर बिल्ट-इन टायर प्रेशर मॉनिटर आणि वेलकम अॅनिमेशन. वायरलेस अॅपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो आणि बिल्ट-इन व्हॉइस रेकग्निशन.
    मॅग्नाईटमध्ये ‘निस्सान कनेक्ट’ टेक्नॉलजीही देण्यात आली आहे, ज्यात ५० हून अधिक फिचर्स आहेत. मॅग्नाईटच्या टॉप मॉडेलमध्ये कस्टम ‘टेक पॅक’ही आहे. ज्यात जेबीएलचे दमदार स्पीकर्स, पॅडल लॅम्प आणि एलसीडी स्कफ प्लेट मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pranit pawar writes article about renault kiger vs nissan-magni