बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Pre Analysis of Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे बुधवारी बाजार कमजोरीसह बंद झाला. युरोपमधील वाढत्या ऊर्जा संकटामुळे आणि चीनमध्ये कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सगळेच आशियाई बाजार कमजोर राहिले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 168.08 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी घसरून 59028.91 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 31.2 अंक अर्थात 0.18 टक्क्यांच्या कमजोरीसह 17624.4 च्या पातळीवर बंद झाला.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात घसरण सुरूच; सेन्सेक्स 168 तर निफ्टी 31 अंकांची घसरण

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजार लाल चिन्हावर राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. जागतिक मंदी आणि व्याजदर वाढीची भीतीचे बाजारावर वर्चस्व राहिले. आता निफ्टीला 17500 वर सपोर्ट दिसत आहे. वरच्या बाजूला, पहिला रझिस्टंस 17700 वर दिसतो. जर निफ्टीने 17700 ची पातळी तोडली तर ती आपल्याला 17800-17850 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, जर निफ्टी खाली 17500 च्या दिशेने घसरला तर विक्रीचा दबाव वाढू शकतो. आणि निफ्टी 17400-17300 च्या दिशेने जाताना आपण पाहू शकतो.

हेही वाचा: Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

निफ्टीमध्ये शॉर्ट टर्म कंसोलिडेशन दिसत आहे आणि या काळात दोन्ही दिशांना स्विंग दिसत असल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. बुधवारच्या व्यवहारात बाजार कमजोरीसह उघडला पण त्यानंतर त्यात मोठी विक्री झाली नाही. शिवाय 17468च्या आसपास काही खरेदीही दिसून आली. आता निफ्टीमध्ये कंसोलिडेशन दिसू शकते. निफ्टी 17700 च्या दिशेने गेलं की त्याला पुन्हा विक्रीचा दबाव येऊ शकतो. तर खाली, निफ्टीने 17500 ची पातळी तोडली तर विक्रीचा दबाव आणखी वाढू शकतो.

जागतिक संकेत आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजार थोड्या घसरणीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. जागतिक बाजारावरील सततच्या दबावाच्या काळात बाजारातील कंसोलीडेशनसोबत तेजीचा कलही कायम आहे. यापुढे परिस्थिती आणखी सुधारताना आपण दिसू शकते.

हेही वाचा: Stock market closing update : शेअर बाजार घसरणीसह बंद

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

श्री सिमेंट (SHREECEM)
अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
कोल इंडिया (COALINDIA)
ग्रासिम (GRASIM)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
डिक्सन (DIXON)
ऍस्ट्रल (ASTRAL)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Pre Analysis Of Share Marekt Update 8 September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..