बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

जर निफ्टी 17500 च्या खाली घसरला तर निफ्टीमध्ये आणखी कमजोरी येऊ शकते.
Share Market pre analysis
Share Market pre analysisesakal

यूएस फेडचे अध्यक्ष जॅक्सन होल यांच्या भाषणानंतर बाजारातील घसरण झटकन दूर झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी बाजारात तेजी दिसली. बाजाराने गुरुवारची घसरण तर भरून काढलीच पण मागच्या आठवड्यात प्रचंड वाढही केली.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1564.45 अंकांच्या अर्थात 2.70 टक्क्यांच्या वाढीसह 59,537.07 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 446.40 अंकांच्या अर्थात 2.58 टक्क्यांच्या वाढीसह 17,759.30 वर बंद झाला.

Share Market pre analysis
Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

आशियाई आणि युरोपीय बाजारातील रिकव्हरीमुळे शुक्रवारी बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बाजाराचे लक्ष व्याजदरांवरील अमेरिकेच्या भूमिकेवरून पहिल्या तिमाहीतील मजबूत GDP डेटाच्या अपेक्षेकडे वळले आहे. प्रचंड अस्थिरता आणि अनिश्चित जागतिक मॅक्रो वातावरण असूनही, शुक्रवारची रॅली सूचित करते की भारतीय बाजार दीर्घकालीन दृष्टीकोनातून उत्कृष्ट आहेत.

खालच्या पातळीवरून मजबूत पुलबॅकमुळे बाजाराचे शॉर्ट टर्म स्ट्रक्चर नेगिटीव्हवरून पॉझिटिव्ह झाले आहे. पण तात्पुरत्या जास्त खरेदीच्या परिस्थितीमुळे, येत्या काळात एका मर्यादेत बाजारातील व्यवहार दिसू शकतो.

17,550 म्हणजेच 20-दिवसांचा SMA ही व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची पातळी असू शकते. ही पातळी ओलांडल्यावर आपण निफ्टी 17800-17850 च्या पातळीवर जाताना पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17500 च्या खाली घसरला तर निफ्टीमध्ये आणखी कमजोरी येऊ शकते. जर निफ्टीने 18000 ची पातळी ओलांडली तर आपण 18300-18350 च्या दिशेने जाताना पाहू शकतो.

Share Market pre analysis
Share Market: शेअर बाजारात मोठी उसळण; Sensex 1,564 वर तर Nifty 446

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

  • टेक महिंद्रा (TECHM)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • एल अँड टी (LTTS)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • डिक्सन (DIXON)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com