बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

एफआयआयची खरेदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीने बाजारात तेजी आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.
Pre Analysis Of Share Market
Pre Analysis Of Share Marketesakal

8 ऑगस्टला अर्थात सोमवारी शेअर बाजार त्यांच्या 4 महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांच्या खरेदीचा परतावा, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट, ऑटो आणि मेटलच्या वाढीमुळे बाजारात पॉझिटीव्ह वातावरण होते. सोमवारी ऑइल-गॅस, आयटी वगळता बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये वाढ झाली.

मेटल, एनर्जी, ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 465.14 अंकांच्या म्हणजेच 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 58,853.07 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 127.60 अंकांच्या म्हणजेच 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 17525.10 वर बंद झाला.

Pre Analysis Of Share Market
Share Market: आठवड्याची सुरूवात चांगल्या तेजीने, गुंतवणुकदारांना दिलासा

सोमवारी संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजारची सुरुवात कमजोर झाली. पण जसजसा व्यवसाय वाढत गेला तसतसा बाजार वाढत गेला. बाजार अखेर दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. मोहरमच्या निमित्ताने काल 9 ऑगस्टला बाजार बंद होता.

एफआयआयची खरेदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीने बाजारात तेजी आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. याशिवाय हेवीवेट शेअर्सनीही बाजाराला साथ दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कमजोर निकालानंतर सोमवारी पीएसयू बँकांवर दबाव दिसून आला. अमेरिकेकडून मिळालेल्या मजबूत जॉब डेटानंतर पाश्चात्य देशांतील बाजार तेजीत राहिल्याचे ते म्हणाले. येत्या आठवड्यात देशांतर्गत आणि जागतिक बाजाराशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण डेटा येणार आहेत. त्यावर बाजाराची नजर राहणार आहे.

बुधवारी कशी असेल बाजाराची स्थिती ?

सुरुवातीच्या दबावानंतर लगेचच बाजाराची सूत्रे बुल्सच्या हातात आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजाराकडे कल वाढला., यामुळे बाजारातील वातावरण सकारात्मक झाले. सोमवारी निफ्टीने 17500 वर शॉर्ट टर्म रझिस्टंस ओलांडला.

बाजारासाठी हे चांगले लक्षण आहे. डेली चार्टवर बुलिश कँडल आणि इंट्राडे ब्रेकआउट फॉर्मेशन सध्याच्या पातळीपासून आणखी वाढ दाखवत आहे. निफ्टीला 17,400 वर महत्त्वाचा सपोर्ट आहे. जर निफ्टी या पातळीच्या वर राहिला तर त्यात 17650-17700 ची पातळी दिसू शकते. दुसरीकडे, जर निफ्टी 17400 च्या खाली घसरला तर आपण तो 17325-17300 च्या दिशेने जाताना पाहू शकतो.

Pre Analysis Of Share Market
Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • एनटीपीसी (NTPC)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • आयआरसीटीसी (IRCTC)

  • भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

Pre Analysis Of Share Market
Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com