Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सोमवारी बाजारात दबाव दिसून आला. मिड आणि स्मॉलकॅपमध्ये विक्री झाली. मिडकॅप 464 अंकांनी घसरून 30565 वर बंद झाला. सेन्सेक्स 251 अंकांनी घसरून 60432 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 86 अंकांनी घसरला आणि 17771 वर बंद झाला.

पीएसई आणि एफएमसीजी इंडेक्स किंचित वाढीसह बंद झाले. त्याचबरोबर आयटी, रिऍल्टी आणि बँकिंग शेअर्समध्येही दबाव दिसून आला. निफ्टी बँक 277 अंकांनी घसरून 41282 वर बंद झाला. ऑटो, फार्मा, एनर्जी इंडेक्स घसरणीवर बंद झाले. (pre analysis of Share Market update 14 February 2023)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीने आता बियरीश इनगल्फिंग पॅटर्न तयार केला आहे जो नजीकच्या काळात बाजारात आणखी कमजोरी दर्शवतो असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. जर निफ्टी 17721 च्या खाली घसरला तर ही घसरण 17517-17545 पर्यंत वाढू शकते. निफ्टीला नियर टर्ममध्ये 17877 च्या वर जाणे कठीण होईल. तिसऱ्या तिमाहीच्या निकालांचा हंगाम पुढील 2 दिवसांत संपेल. गेल्या काही दिवसांत आलेल्या निकालाने बाजाराची निराशा केली आहे.

गेल्या 1 आठवड्यापासून निफ्टी एका रेंजमध्ये फिरत असल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. आता जोपर्यंत निफ्टी 17850-17900 च्या वर जाऊन ताकद दाखवत नाही तोपर्यंत तो या रेंजमध्ये पुढे जात राहील. दुसरीकडे, डेली मोमेंटम इंडिकेटर पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर देत आहे, जो 'बाय' सिग्नल आहे. यावरूनही घसरणीत खरेदी करावी, असे संकेत मिळत आहेत.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
इन्फोसिस (INFY)
अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)
ए यू बँक (AUBANK)


नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.