
Share Market Tips : चांगल्या तिमाही निकालांनतरही 'हे' शेअर्स विकण्याचा एक्सपर्ट्सचा सल्ला; कारण...
Share Market Tips : अशोक लेलँडच्या (Ashok Leyland) शेअर्सने त्यांच्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला रिटर्न दिला आहे. गेल्या काही दिवसांत त्यात तीन टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.
शिवाय लाँग टर्ममध्ये त्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. पण आता बाजारातील तज्ज्ञ अशोक लेलँडचे शेअर्स विकण्याचा सल्ला देत आहेत.
मजबूत डिसेंबर तिमाही निकाल असूनही, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने याला सध्याच्या किंमतीपेक्षा 25 टक्क्यांनी खाली 116 रुपयांचे सेल रेटिंग दिले आहे. त्याचे शेअर्स बीएसईवर सध्या 153.85 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
अशोक लेलँडने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 360 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. हे ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अंदाजापेक्षा खूप जास्त होते.
मार्जिनही तिमाही आधारावर 2.30 टक्क्यांनी सुधारुन 8.8 टक्क्यावर पोहोचली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर 2022 च्या पहिल्या नऊ महिन्यांत, अशोक लेलँडने हेवी आणि कमर्शियल व्हेहिकल्स (MHCV) गुड्स सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचा मार्केट शेअर 7.70 टक्क्यांनी वाढवून 32.1 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मि़डियम आणि हेवी कमर्शियल व्हेहिकल्स (MHCV) पॅसेंजर सेगमेंटमध्ये मार्केट शेअर 8.20 टक्क्यांनी घसरून 28.6 टक्क्यांवर आला आहे. याशिवाय, लो कमर्शियल व्हेईकल (LCV) गुड्समध्येही त्याचा मार्केट शेअर घसरला आहे.
मालवाहतुकीमध्ये रेल्वेचा हिस्सा वाढवण्यावर सरकार भर देत आहे आणि 2030 पर्यंत तो सध्याच्या 29 टक्क्यांवरून 40-45 टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे टारगेट आहे, जे कमर्शियल व्हेहिकल सेक्टरसाठी नकारात्मक आहे.
ब्रोकरेज फर्मने डिसेंबर तिमाहीच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर आपला FY23 अंदाज वाढवला, पण त्याच्या FY24-25 अंदाजात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे, ब्रोकरेजने 116 रुपयांच्या टारगेटसह सेल रेटिंग कायम ठेवले आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.