Share Market : आज कोणते टॉप 10 शेअर्स करतील परफॉर्म?

निफ्टीची रचना 18,300 स्तरावर असलेल्या कंसोलिडेशन रेंजच्या खालच्या टोकाकडे जात असल्याचे दर्शवत असल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले.
Share Market
Share Marketsakal

विकली एक्सपायरीआधी गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. 2023 पर्यंत अमेरिकेतील वाढत्या दरांच्या शक्यतेमुळे बाजार निराश झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 500 अंकांच्या खाली घसरला.

त्याचवेळी निफ्टीही 18500 च्या खाली घसरला आहे. शिवाय सर्वच क्षेत्रात विक्री दिसून आली. अमेरिकेत मंदीच्या शक्यतेमुळे आयटी क्षेत्रात भीती निर्माण झाली आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक सुमारे 1.5 टक्क्यांनी घसरला आहे.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 878.88 अंकांनी म्हणजेच 1.40  टक्क्यांनी घसरून 61,799.03 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 245.40 अंकांनी म्हणजेच 1.32 टक्क्यांनी घसरून 18,414.90 वर बंद झाला. (Pre analysis of Share Market Update 16 December 2022 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीची रचना 18,300 स्तरावर असलेल्या कंसोलिडेशन रेंजच्या खालच्या टोकाकडे जात असल्याचे दर्शवत असल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. निफ्टीला आता 18300 वर सपोर्ट दिसत आहे.

या पातळीच्या आसपास पुन्हा एकदा खरेदी दिसून येईल. एकूण दृष्टीकोनातून, निफ्टीची 18300-18700 ची शॉर्ट टर्म कंसोलीडेशन रेंज कायम आहे. पुढील काही ट्रेडिंग सत्रांसाठी निफ्टी या रेंजमध्ये फिरताना दिसेल.

Share Market
Share Market Closing : 144 अंकांच्या तेजीसह बाजार बंद; बँक निफ्टी पहिल्यांदाच 44,000 च्या वर

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टेक महिन्द्रा (TECHM)
टायटन (TITAN)
इन्फोसिस (INFY)
ग्रासिम (GRASIM)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
पेज इंडिया (PAGEIND)
एबीबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ABB)
ऍस्ट्रल (ASTRAL)
ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)

Share Market
Stock Market Investment : 'या' स्टॉकने गेल्या दोन वर्षात दिला तिप्पट रिटर्न...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com