बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Pre Analysis Of Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

निफ्टीची सप्टेंबरची सुरुवात नेगिटीव्ह झाली आणि आदल्या दिवशीची वाढ गमावली. कमकुवत जागतिक ट्रेंड आणि व्याजदर वाढीच्या चिंतेमुळे निफ्टी 1.2 टक्क्यांनी घसरून 17,543 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीने डेली चार्टवर एक छोटी तेजीची कँडल तयार केली जेव्हा तो दिवसाच्या नीचांकावरून सावरला. आदल्या दिवशीची गॅप-अप रेंज (सुमारे 17,400) एक महत्त्वाचा सपोर्ट म्हणून काम करेल अशी शक्यता आहे. निफ्टीला मजबूती मिळण्यासाठी तो 17400 च्या वर बंद होणे आवश्यक आहे. (pre analysis of share market update 2 september 2022)

हेही वाचा: Share Market: तेजीला पुन्हा ब्रेक; सेन्सेक्समध्ये 493 तर निफ्टीत 135 अंकांची घसरण

दिवसभर निफ्टीची ट्रेडिंग रेंज 17,777 ते 17,401 च्या दरम्यान दिसल्याचे चार्टव्यूइंडियाचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट मजहर मोहम्मद म्हणाले. मंगळवारीही निफ्टी जवळपास त्याच रेंजमध्ये ट्रेडिंग करताना दिसला.

इंडेक्स मजबूत राहण्यासाठी गुरुवारी 17,401 आणि 17,380 च्या बुलिश गॅप झोनचा बचाव करणे आवश्यक आहे. जर निफ्टीने 17,380 ची पातळी तोडली तर त्यात कमजोरी येऊ शकते. यामुळे इंडेक्स 17,166 च्या नीचांकी पातळीवर जाऊ शकतो.

हेही वाचा: Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

गुरुवारी बँक निफ्टी 38,807 वर नेगिटीव्ह उघडला. ही देखील दिवसातील नीचांकी पातळी होती. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर निर्देशांक 235 अंकांनी घसरून 39,301 वर बंद झाला.

डेली स्केलवर ती एक बुलिश कँडल तयार करते कारण त्याची क्लोझिंग लेव्हल त्याच्या ओपनिंगपेक्षा जास्त होती.

जर बँक निफ्टीला 39,750 आणि 40,000 कडे जायचे असेल तर ते 39,250 च्या वर राहिले पाहिजे असे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चंदन तापडिया यांनी सांगितले. यात 39,000 आणि 38,888 स्तरांवर सपोर्ट दाखवत आहे.

हेही वाचा: Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • टाटा कांझ्युमर (TATACONSUM)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • एशियन पेंट्स (ASIANPAINT)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • ॲस्ट्रल (ASTRAL)

  • भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड (BEL)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • ए यू बँक (AUBANK)

Web Title: Pre Analysis Of Share Market Update 2 September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..