Share Market: तेजीला पुन्हा ब्रेक; सेन्सेक्समध्ये 493 तर निफ्टीत 135 अंकांची घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Latest Updates

Share Market: तेजीला पुन्हा ब्रेक; सेन्सेक्समध्ये 493 तर निफ्टीत 135 अंकांची घसरण

शेअर बाजारात मंगळवारी चांगलीच तेजी पाहायला मिळाली होती. तर आज सुरवतीच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 493 अंकांची घसरण झाली तर निफ्टीमध्ये 135 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.70 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,122 अंकांवर सुरू झाला तर निफ्टीमध्ये 0.67 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,647 अंकांवर सुरू झाला आहे.

आशियाई आणि युरोपीय बाजारातील रिकव्हरीमुळे शुक्रवारी बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बाजाराचे लक्ष व्याजदरांवरील अमेरिकेच्या भूमिकेवरून पहिल्या तिमाहीतील मजबूत GDP डेटाच्या अपेक्षेकडे वळले आहे. प्रचंड अस्थिरता आणि अनिश्चित जागतिक मॅक्रो वातावरण असूनही, शुक्रवारची रॅली सूचित करते की भारतीय बाजार दीर्घकालीन दृष्टीकोनातून उत्कृष्ट आहेत.

हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

खालच्या पातळीवरून मजबूत पुलबॅकमुळे बाजाराचे शॉर्ट टर्म स्ट्रक्चर नेगिटीव्हवरून पॉझिटिव्ह झाले आहे. पण तात्पुरत्या जास्त खरेदीच्या परिस्थितीमुळे, येत्या काळात एका मर्यादेत बाजारातील व्यवहार दिसू शकतो.

17,550 म्हणजेच 20-दिवसांचा SMA ही व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची पातळी असू शकते. ही पातळी ओलांडल्यावर आपण निफ्टी 17800-17850 च्या पातळीवर जाताना पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17500 च्या खाली घसरला तर निफ्टीमध्ये आणखी कमजोरी येऊ शकते. जर निफ्टीने 18000 ची पातळी ओलांडली तर आपण 18300-18350 च्या दिशेने जाताना पाहू शकतो.

Web Title: Share Market Opening Update 1 September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..