Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

चार दिवसांच्या विक्रीनंतर सोमवारी देशांतर्गत बाजारांत तेजी दिसून आल्याचे जियोजित फायनान्शिअलचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
Share Market
Share Marketsakal

Share Market : सोमवारी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आणि बाजार तेजीसह बंद झाला. फार्मा वगळता जवळपास सर्वच क्षेत्रांत चांगली खरेदी दिसून आली. सेन्सेक्स 721.13 अंकांनी अर्थात 1.20 टक्क्यांनी वाढून 60,566.42 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 207.80 अंकांनी अर्थात सुमारे 1.17 टक्क्यांनी वाढून 18,014.60 वर बंद झाला. (pre analysis of share market update 27 December 2022 )

Share Market
Best Stock : मल्टीबॅगर ठरलेला 'हा' शेअर विक्री करण्याचा शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

चार दिवसांच्या विक्रीनंतर सोमवारी देशांतर्गत बाजारांत तेजी दिसून आल्याचे जियोजित फायनान्शिअलचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसली. त्याच वेळी, मिड- आणि स्मॉल-कॅप शेअर्सनीही बेंचमार्क निर्देशांकांपेक्षा जास्त नफा नोंदवला.

गेल्या आठवड्यात जोरदार विक्रीनंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये मजबूत सुधारणा दिसून आल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले. निफ्टी वाढीसह उघडला आणि मजबूतीनंतर 208 अंकांच्या (1.2%) वाढीसह 18015 वर संपला.

सलग 3 आठवड्यांच्या घसरणीनंतर सोमवारी बाजाराने रिकव्हरी दाखवली. निफ्टी मिडकॅप 100 आणि स्मॉलकॅप 100 या दोघांनी अनुक्रमे 2.7% आणि 3.8% वाढीसह निफ्टीला मागे टाकले.

Share Market
Pharma Stock : साडे तीन हजाराचे झाले 1 कोटी, 'या' स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल

वर्षअखेरीस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोणतीही मोठी जागतिक घटना घडण्याची आशा फार कमी आहे. त्यामुळे अशा घटना नसतानाही बाजार सकारात्मक राहील अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. येत्या काळात बँक, ऑटो, कॅपिटल गुड्स आणि डिफेन्स सेक्टरवर अधिक फोकस राहिल असेही ते म्हणाले.

Share Market
Share Market : 'या' रबर कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; चार महिन्यात संपत्तीत दुप्पट वाढ

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
हिन्दाल्को (HINDALCO)
कोल इंडिया (COALINDIA)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
ट्रेंट (TRENT)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
भारत फोर्ज (BHARATFORG)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com