Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?
pre analysis of share market
pre analysis of share marketsakal

सोमवारी सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला. इंट्राडेमध्ये सेन्सेक्स 62701.4 च्या पातळीवर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी, तो 211.16 अंकांच्या अर्थात 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 62504.80 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टीनेही 18614.25 हा नवा उच्चांक गाठला. शेवटी, तो 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 18562.80 च्या पातळीवर बंद झाला.

निफ्टीने 13 महिन्यांनंतर नवा रेकॉर्ड केला. कमजोर जागतिक संकेतांमुळे आज भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. पण लवकरच तो सावरला आणि व्यापाराच्या शेवटी विक्रमी उच्चांकावर बंद झाला. (pre analysis of share market update 29 November 2022)

pre analysis of share market
Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीला 18400 आणि 18300 वर चांगला सपोर्ट असल्याचे शेअर खानचे गौरव रत्न पारखी म्हणाले. जोपर्यंत निफ्टी या सपोर्ट झोनच्या वर राहील, तोपर्यंत त्यात तेजी येण्याची शक्यता आहे. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 18400 आणि नंतर 18900 च्या दिशेने जाताना दिसेल.

जागतिक चिंता असूनही भारतीय बाजारात स्थिर वाढ दिसत असल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. भारत यापुढेही इतर बाजारांना मागे टाकत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कंपन्यांच्या मजबूत कामगिरीचा आणि मागणीत वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्था आणि बाजार या दोघांनाही फायदा होईल.

सध्या आयटी, ऑटो आणि बँकिंग सेक्टर्स चांगले दिसत आहे. निफ्टीसाठी 18450 वर सपोर्ट दिसत आहे, तर 18650 वर रझिस्टंस दिसत आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 42500 वर समर्थन आहे. 45350 वर सपोर्ट तर 45350 वर रझिस्टंस आहे.

pre analysis of share market
Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बीपीसीएल (BPCL)
रिलायन्स (RELIANCE)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
टाटा कंझ्युमर (TATACONSUM)
एसबीआय लाईफ (SBILIFE)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
एमआरएफ (MRF)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
व्होल्टास (VOLTAS)

 मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com