बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

सध्या बाजाराची दिशा स्पष्ट दिसत नाही
Share Market Update
Share Market UpdateSakal
Updated on

विकली एक्सपायरीच्या दिवशी अर्थात गुरुवारी मार्केट रेंजमध्ये राहिल्याचे दिसले. सेन्सेक्स 70 अंकांनी घसरून 60836 वर आणि निफ्टी 30 अंकांनी घसरून 18053 वर बंद झाला. बँक निफ्टी खालच्या स्तरावरून 1 टक्क्यांनी वाढला.

पॉवर, आयटी शेअर्स मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची सर्वाधिक विक्री झाली. निफ्टी बँक 152 अंकांनी वाढून 41298 वर बंद झाला. मिडकॅप 107 अंकांनी वाढून 31787 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्सची विक्री झाली. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 25 शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 शेअर्सची खरेदी झाली. (Pre Analysis of Share Market Update)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये बरीच अस्थिरता दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. निफ्टी 35 अंकांनी घसरून बंद झाला. दुसरीकडे, सेन्सेक्स 112 अंकांनी घसरून बंद झाला. जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांवर नजर टाकली तर आयटी निर्देशांकात सर्वात मोठी घसरण झाली आहे. तो 1.14 टक्क्यांनी घसरला आहे, तर पीएसयू बँक निर्देशांक 2.46 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे.

कमजोर जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार आज कमजोरीसह उघडला, पण गॅप डाउन ओपनिंगनंतर, त्यात बाउन्सबॅक दिसून आला. पण, अर्ली मॉर्निंग इंट्राडे रॅलीनंतर दिवसभर बाजार एका रेंजमध्ये फिरत राहिला. सध्या बाजाराची दिशा स्पष्ट दिसत नसल्याचे ते म्हणाले.

Share Market Update
Share Market Closing : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

निफ्टीने 2 नोव्हेंबरला इनगल्फिंग बियर कँडलसह बियरिश आउटसाइड बार तयार केल्याचे शेअरखानचे रत्नपारखी म्हणाले.  त्यानंतर तो शॉर्ट टर्म कंसोलिडेशनमध्ये गेला. गुरुवारच्या व्यवहारात निफ्टी इंट्राडे बेसिसवर 18000 वर असलेल्याइमीडिएट सपोर्टच्या खाली गेला आहे.

क्लोजिंग बेसिसवर 18000 ची पातळी तुटली तर निफ्टी 17800 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, निफ्टीसाठी 18200 वर शॉर्ट टर्म रझिस्टन्स दिसत आहे. यासाठी, 17800-18200 ही शॉर्ट टर्म कंसोलिडेशन रेंज असेल असेही ते म्हणाले.

Share Market Update
Stock: 'या' सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना बनविले कोट्यधीश, 1 लाखाचे केले 2.77 कोटी

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
टेक महिन्द्रा (TECHM)
हिन्दाल्को (HINDALCO)
पॉवरग्रीड (POWERGRID)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
एनटीपीसी (NTPC)
व्होल्टास (VOLTAS)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
हिन्दुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)
पेज इंडिया (PAGEIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com