Stock: 'या' सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना बनविले कोट्यधीश, 1 लाखाचे केले 2.77 कोटी | Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market.

Stock: 'या' सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना बनविले कोट्यधीश, 1 लाखाचे केले 2.77 कोटी

सरकारी मालकीची कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या  (BPCL) शेअर्सने गुंतवणूकदारांना फारसा नफा दिला की नाही याचा विचार करावा लागेल, पण जर तुम्ही बोनस शेअर्सचा इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ही सरकारी कंपनी तिच्या लाँग टर्न गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरली आहे.

गेल्या 22 वर्षांत बीपीसीएलच्या शेअरची किंमत 13.50 रुपयांवरून 311.60 रुपये झाली आहे. या कालावधीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 4 वेळा बोनस शेअर्स जारी केले आहेत. जेव्हा हेबोनस शेअर्स जोडले, तेव्हा लक्षात आले की 22 वर्षांपूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये या कंपनीने 2.77 कोटी केले आहेत.

हेही वाचा: Stock: एक रुपयापेक्षा कमी किंमतीच्या 'या' शेअरने गुंतवणूकार कोट्याधीश...

बीपीसीएलने 2000 पासून चार वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. डिसेंबर 2000, जुलै 2012, जुलै 2016 आणि जुलै 2017. यापैकी डिसेंबर 2000, जुलै 2012 आणि जुलै 2016 मध्ये कंपनीने 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स शेअरधारकांना दिले. तर जुलै 2017 मध्ये, 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स घोषित केले होते.

ही कंपनी 1952 मध्ये स्थापन झाली आणि तिचे नाव 1977 मध्ये बदलून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPLC) करण्यात आले. देशात (बॉम्बे हाय) सापडलेल्या नवीन कच्च्या तेलाच्या साठ्यावर प्रक्रिया करणारी ही पहिली रिफायनरी ठरली.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात दिवसभरात तेजी; सेन्सेक्स 156 तर निफ्टी 57 अंकांवर

देशांतर्गत ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या स्टॉकवर बाय रेटींग दिले आहे. टारगेट 358 रुपयांचे दिले आहे. बीपीसीएलचे शेअर्स गुरुवारी एनएसईवर 311.00 रुपयांवर बंद झाले. म्हणजेच ब्रोकरेजला सध्याच्या हे शेअर्स भावापेक्षा सुमारे 15 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.