अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह अर्थमंत्री साधणार संवाद

टीम ई-सकाळ
Tuesday, 27 August 2019

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (मंगळवार) पुण्यात येणार आहेत. 'ऑटोमोबाईल हब' असलेल्या पुण्यातील वाहन उद्योगाच्या आणि त्यासंबंधित उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुण्यात येत आहे.

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (मंगळवार) पुण्यात येणार आहेत. 'ऑटोमोबाईल हब' असलेल्या पुण्यातील वाहन उद्योगाच्या आणि त्यासंबंधित उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुण्यात येत आहे. त्यांच्यासोबत अर्थराज्य मंत्री अनुराग सिंग ठाकूर, आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त अनुराधा भाटिया यांसारख्या अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह अर्थमंत्री संवाद साधणार आहेत. 

आर्थिक मंदीच्या झळा तीव्र झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी वाहन उद्योग, गृहनिर्माण उद्योग, लघू-मध्यम उद्योगकेंद्रित उपाययोजनांचा पहिला हप्ता सीतारामन यांनी नुकताच जाहीर केला.  देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार आता विविध पावले उचलत आहे.

पुण्यात देखील सीतारामन आता विविध क्षेत्रातील उद्योजकांसोबत चर्चा करणार आहेत. शिवाय प्राप्तिकर व जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांशी एकत्रित संवाद साधण्याची शक्यता आहे. या बैठकीत सीबीडीटीचे चेअरमन प्रमोद चंद्र मोदी, रेव्हेन्यू सेक्रेटरी अजय भूषण पांडे, सीबीआयसीचे चेअरमन प्रणब कुमार दास, चीफ कमिशनर, जीएसटी अँड कस्टम, पुणे झोनचे वासा सेशगिरी राव हेदेखील उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Presence of Senior Officers FM Nirmala Sitharaman talk to media