1 जुलैपासून ‘या’ वाहनांच्या किंमती वाढणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई: येत्या 1 जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होणार आहे. जीएसटीमुळे देशभरात काही वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत तर काही वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. ऑटो कंपन्यांनी जीएसटी लागू होण्यापूर्वीच सूट जाहीर केली आहे. मात्र मारुतीची दोन वाहने महागणार आहेत. मारुतीची सियाझ आणि 'मल्टिपर्पज व्हेइकल' (एमपीव्ही) गटातील अर्टिगा या गाड्यांच्या किंमती जवळपास दीड लाखाने वाढण्याची शक्यता आहे.

मारुतीच्या दोन्ही गाड्या सुमारे दीड लाख रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. जीएसटीमध्ये हायब्रिड वाहनांच्या किंमती वाढणार आहेत. अजुन किती वाढ होणार याबाबत कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. या दोन्ही वाहनांमध्ये ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, स्मार्ट प्ले टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, कि-लेस एन्ट्री, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटन सारखे मॉडर्न फिचर्स दिले आहेत. त्यासोबतच या दोन्ही कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, इएसपी आणि इसोफिक्श चाईल्ड सेफ्टी माऊंट सारखे सेफ्टी फिचर्सही देण्यात आले आहेत.

Web Title: The price of these 'vehicles' will increase from 1 July