esakal | वाहतुकीतून परिवर्तन करूया; जलवाहतूक मंत्र्यांचे उद्गार | sarbanand sonowal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarbananda Sonowal

वाहतुकीतून परिवर्तन करूया; जलवाहतूक मंत्र्यांचे उद्गार

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : नौवहन क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी तसेच वाहतुकीतून परिवर्तन हे पंतप्रधानांचे (prime minister) ध्येय साध्य करण्यासाठी देशातल्या वेगवेगळ्या प्रांतांमधील विद्यार्थ्यांना (student) जलशक्तीचे प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन केंद्रीय जलवाहतूक (central cargo) आणि बंदरे खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल (Sarbananda sonowal) यांनी आज येथे केले. तर सन 2030 पर्यंत नद्यांमधून मालवाहतूक करण्याचे ध्येय असल्याचे राज्यमंत्री शंतनू ठाकूर (shantanu thakur) म्हणाले.

हेही वाचा: पूर्व उपनगरात यंदा गरबा नाहीच; मुंबईत शंभर कोटींचे व्यवहार ठप्प

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त पवई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मुंबईचे महत्वाचे स्थान आहे व त्यात शिपिंग कॉर्पोरेशनचाही मोठा वाटा आहे, असेही सोनोवाल यावेळी म्हणाले. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने संघभावनेतून आपली ताकद दाखवली पाहिजे. शिपिंग कॉर्पोरेशनच्या पाण्यातील ताकदीची ओळख सर्वांना झाली पाहिजे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्याचा योग्य तो उपयोग झाला पाहिजे.

त्याचमुळे देशाचा विकास होईल, त्याचसाठी लौकरच सागरी वाहतूक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग केले जातील, असेही ते म्हणाले. देशातील वेगवेगळ्या प्रांतांमधील विद्यार्थ्यांना आपल्या सागरी शक्तीची ओळख करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. हा अनुभव देशाला देऊन आपली ताकद देशासाठी कशी वापरावी हे सर्वांना कळण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सोनोवाल यांनी सांगितले.

2030 पर्यंत नदीतून मालवाहतूक

समुद्री वाहतुकीबरोबरच नद्यांमधून मालवाहतुकीचे मार्ग विकसित करणे महत्वाचे आहे. कारण रस्त्यांद्वारे केलेली मालवाहतूक खर्चिक होत असून त्यामानाने जलवाहतूक अत्यंत स्वस्त आहे. सन 2030 पर्यंत नद्यांमधून प्रमुख शहरांना जोडणारी जलवाहतूक सुरु करणे हे आपले ध्येय आहे, असे केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री शंतनू ठाकूर म्हणाले.

यावेळी मुंबई पोर्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा हजर होते. आर्थिक अडचणी असतानाही वेगवेगळ्या उपाययोजनांच्या आधारे कॉर्पोरेशनने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष श्रीमती एच. के. जोशी म्हणाल्या. संचालक अतुल उबाळे यांनी आभार मानले.

loading image
go to top