esakal | पूर्व उपनगरात यंदा गरबा नाहीच; मुंबईत शंभर कोटींचे व्यवहार ठप्प | Navratri Festival
sakal

बोलून बातमी शोधा

Restrictions on garba

पूर्व उपनगरात यंदा गरबा नाहीच; मुंबईत शंभर कोटींचे व्यवहार ठप्प

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : पूर्व उपनगरांमध्ये 1994 पासून मोठ्या धडाक्यात होणारा जैन जागृती सेंटरचा गरबा (Garba dance) यंदा होणार नसल्याने किमान एक कोटीची उलाढाल ठप्प पडणार आहे. मुंबईत यावेळीही गरबा होणार नसल्याने (no Garba in mumbai) सर्व मिळून शंभर कोटींची उलाढाल होणार नसल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा: तरुणाईच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय युवा संघटनांंनी एकत्र यावे - वरुण सरदेसाई

घाटकोपरच्या (पूर्व) पोलिस हॉकी मैदानात हा गरबा रंगत असे. यात आठ दिवस रोज दहा हजार तरुण-तरुणी आपले नृत्यकौशल्य दाखवीत असत. यासाठी मंडळाला सुमारे ऐंशी लाख रुपये खर्च येत होता, त्यासाठी जाहिरातदार, प्रायोजकही पुढे येत असात, असे मंडळाचे अध्यक्ष रमेश मोराबिया यांनी सकाळ ला सांगितले. कोरोनाच्या निर्बंधांमुळे मागीलवर्षी ऑनलाईन गरबा झाला. मात्र यंदा तो देखील न होण्याची शक्यता आहे. गरबा खेळण्याबाबत आतापर्यंत आमचा काहीही निर्णय झाला नाही, असेही रमेशभाई म्हणाले.

मुंबईत या गरब्यासह बोरीवलीत कोराकेंद्रला मोठा गरबा दरवर्षी होत असे. त्याचीही उलाढाल काही कोटींमध्ये होती. तर दक्षिण मुंबईत उमरखाडी, गिरगाव येथेही मोठे गरबे होत असत. त्याखेरीज मराठी गरबा, फाल्गुनी पाठक गरबा यासह अनेक लहानमोठे गरबे मुंबईत होतात. या गरब्यांसाठी होणारा खर्च, प्रायोजकत्व, तिकिटे तसेच पोषाख आदींवर होत असलेला खर्च हे जमेस धरता दरवर्षी मुंबई किमान शंभर कोटींची उलाढाल होते असा अंदाज आहे. यावर्षीही ती सारी उलाढाल ठप्प पडणार आहे.

मागील वर्षीही निर्बंध असल्याने जैन जागृती सेंटरतर्फे आठ दिवस व्हर्चुअल गरबा खेळण्यात आला. अंधेरीच्या स्टुडियोमध्ये जेमतेम वीस-तीस तरुणांनी गरबा खेळून तो जेजेसी नॉर्थइस्ट या यूट्यूब चॅनलवरून जगभर दाखविण्यात आला. हजारो लोकांनी त्यास प्रतिसाद दिला, त्यासाठीही आम्हाला साडेपाच ते सहा लाख रुपये खर्च आला. तो आम्हीच सर्व सदस्यांनी केला, असेही रमेश मोराबिया म्हणाले. एरवी आमच्या आठ दिवसांच्या गरब्यात एक दिवस फाल्गुनी पाठकही येत असे. मात्र यावर्षी काय करायचे याचा निर्णय आम्ही अद्याप घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top