भारतातील नोंदणीकृत कंपन्यांनाच कापड क्षेत्राशी संबंधित PLI योजनेचा फायदा

कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
textile mill photo
textile mill photo

भारत सरकारने कापड उद्योगाशी निगडीत पीएलआय योजनेअंतर्गत काही घोषणा केल्या आहेत. या योजनेची अधिसूचना देताना, केवळ भारतातील नोंदणीकृत कंपन्यांनाच कापड क्षेत्राशी संबंधित PLI (product linked incentive scheme) योजनेचा फायदा घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आले. कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

सहभागी कंपन्यांना त्यांच्या कारखानाच्या परिसरात प्रक्रिया आणि ऑपरेशन उपक्रम राबवावे लागतील. प्रोत्साहन मिळवण्याच्या दाव्यांचा विचार करताना काही महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला जाईल. यामध्ये व्यापार आणि बाह्य स्त्रोतांद्वारे केलेल्या कामाशी संबंधित व्यवसाय विचारात घेतला जाणार नाही, असे मंत्रालयाने सांगितले.

कापड क्षेत्रासाठी नुकत्याच मंजूर झालेल्या 10,683 कोटी रुपयांच्या उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत भारतात नोंदणीकृत उत्पादन कंपन्याच सहभागी होण्यास पात्र असतील. वस्त्रोद्योग मंत्रालयाने एका अधिसूचनेत ही माहिती दिली आहे.

प्रोत्साहनासाठी(PLI) पात्र कोण?

केवळ योजनेअंतर्गत नोंदणीकृत कंपनीद्वारे उत्पादन केलेला माल प्रोत्साहन योजनेसाठी पात्र असेल. इतर उत्पादक किंवा त्याच व्यापारी गटाच्या इतर कंपन्यांनी उत्पादित केलेला माल वाढीव उलाढालीच्या गणनेत समाविष्ट केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com