मालमत्तेच्या विरुद्ध कर्ज घेताना हे घटक लक्षात ठेवा

मालमत्तेच्या विरुद्ध कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेले घटक
Loan
Loansakal

मालमत्तेच्या विरुद्ध कर्ज घेताना हे घटक लक्षात ठेवा

आपल्याला घरामुळे केवळ सामाजिक सुरक्षा आणि मन:शांतीच लाभत नाही, तर हा उत्पन्नाचा स्त्रोतही ठरू शकतो. जर तुम्ही स्वत:च्या मालकीच्या घरात किंवा मालमत्तेत राहत नसाल तर भाड्यावर घर देता येते आणि हाच तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत ठरेल. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला रोख रकमेची कमतरता जाणवत असेल, तर मालकीची मालमत्ता गहाण ठेवून अपेक्षित खर्च भागवता येतो.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (एलएपी) हे कर्जाचे हातचे साधन ठरते. ज्यामुळे तुमचा मोठा खर्च भागण्यास साह्य मिळते. जर तुम्ही मालमत्तेचे मालक असाल किंवा तुम्हाला तातडीने पैशांची आवश्यकता असल्यास, तुम्ही मालमत्ता गहाण ठेवून कर्ज मिळवू शकता. वैयक्तिक कर्जाप्रमाणे, loan against property (मालमतेविरुद्ध कर्ज) हा एक सुरक्षित पर्याय ठरतो, त्यामुळे अल्प व्याज दरात कर्ज मिळू शकते. त्यात मिळणारा एक अतिरिक्त फायदा म्हणजे तुम्ही कर्जाऊ घेतलेल्या रकमेचा वापर स्वत:च्या मर्जीच्या खर्चाकरिता करू शकता – त्याच्या वापरावर कोणतीही मर्यादा नाही

त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे मालमत्ता गहाण ठेवून त्याबदली कर्ज घेऊनही, तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय राहू शकता, आणि एकदा का कर्ज फिटले की, मालमत्तेचे सगळे दस्तावेज तुम्हाला परत करण्यात येतात. त्यात काहीही गहाळ होत नाही. मालमत्तेच्या विरुद्ध कर्ज घेण्याचा पर्याय हा सर्वाधिक सुरक्षित ठरतो. जेणेकरून सर्वाधिक कमी व्याजदरात पैशाची सोय होते. तरीच, ही वचनबद्धता कोणत्याही प्रमाणात घेता येते, मालमत्ता गहाण ठेवताना सावध व्यवहार झाला पाहिजे. कोणत्याही क्षणी हफ्ता चुकविल्यास मालमत्ता कर्ज उपलब्ध करून देणाऱ्याच्या मालकीची होऊ शकते. अशाप्रकारे कर्जवसुली करण्यात येते.त्या मुद्यावर आपण मालमत्तेच्या विरुद्ध कर्जाकरिता अर्जाच्या घटकांकडे लक्ष दिले पाहिजे. अशाप्रसंगी काही अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी संशोधन करण्याची शिफारस आम्ही आपल्याला करू.

मालमत्तेच्या विरुद्ध कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेले घटक व्याज दर

मालमत्तेच्या विरुद्ध उपलब्ध असणारी कर्ज ही तुम्हाला मिळणाऱ्या व्याज दराच्या अधीन असतात, हा व्याज दर ठरावीक घटकांवर अवलंबून असतो. जसे की, मालमत्ता गहाण ठेवणे, कर्जाची किंमत, स्वीकारलेला पर्याय आणि सर्वात महत्त्वाचे – अर्जदाराची प्रोफाईल आणि वित्तीय अस्तित्व.

आम्ही सर्व कर्ज इच्छुक व्यक्तिना सल्ला देतो की, कर्ज पर्याय निवडण्यापूर्वी वेळ द्या आणि आपलं संशोधन सावधगिरीने करा. स्वत:च्या गरजेनुरूप कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या कर्जदारांचा पर्याय लक्षात घ्या. त्यामुळे अर्ज रद्द होण्याचे प्रकार घडणार नाहीत. तुमचा सीबील स्कोअर राखला जाईल आणि सातत्याने येणाऱ्या चौकशी तसेच नकारावर विपरीत परिणाम होणार नाही.

तुमचे प्रस्तावित ईएमआय वेळापत्रक जाणून घेण्यासाठी loan against property EMI calculator (मालमत्तेविरुद्ध कर्ज ईएमआय कॅलक्युलेटर)वापरता येईल. तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे – तुमची अपेक्षित कर्ज रक्कम, पसंतीचा व्याज दर आणि परतावा कालावधी निश्चित होईल. त्यामुळे स्वत:च्या परतावा क्षमतेची वास्तविक कल्पना येऊ शकेल आणि तुमच्या वित्तीय स्थैर्याविषयी कोणतीही तडजोड न करता किती कर्ज रक्कम उपलब्ध होऊ शकते, हे समजेल.

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने मालमत्ता गहाण ठेवून प्रती वर्ष 7.95%* इतक्या अल्प दरात वेतनधारक अर्जदारांकरिता कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी कर्ज पुरवठादाराच्या वतीने विचारण्यात आलेल्या मूलभूत पात्रतेत कर्जइच्छुक व्यक्ति बसली पाहिजे.

मालमत्तेचे मूल्यांकन आणि कर्ज रक्कम

मंजूर झालेली कर्ज रक्कम ही प्राथमिक स्वरूपात गहाण ठेवण्यात येणाऱ्या मालमत्तेच्या किंमतीनुरूप तारण ठेवण्यात यावी. बहुसंख्य गृहकर्ज उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या (एचएफसी) मालमत्तेच्या एकूण किंमतीच्या 50% ते 60% कर्ज उपलब्ध करून देतात, काही गृह कर्ज साह्य देणारे घटक मालमत्तेच्या 70%* रक्कम कर्जाऊ देतात.

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने कर्जदाराला रू. 5 कोटी* किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज उपलब्ध होते, जे त्याच्या पात्रतेवर अवलंबून असते. जेव्हा कर्जदात्याच्या समाधानानुसार मालमत्तेचे मूल्यांकन झाल्यास तितकी रक्कम कर्जाऊ स्वरुपात कर्ज इच्छुक व्यक्तिला उपलब्ध करून दिली जाते.

कालावधी

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि पात्र कर्जदारांना 20* वर्षांच्या कालावधीसाठी मालमत्तेच्या बदल्यात कर्ज उपलब्ध होऊ शकते. एखादी व्यक्ति आरामात कर्जाची परतफेड करू शकते याची खातरजमा हा कर्ज कालावधी करतो. त्यासाठी आपली वित्तीय उद्दिष्टे किंवा बचतीला धक्का लावण्याची आवश्यकता नाही.

तरीच, प्रदीर्घ कालावधी नेहमीच कमाल किफायतशीर कर्जाची हमी देत नाही हे लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते. तरीच अल्पावधी ठेवणे कठीण ठरू शकते. याचा अर्थ, कर्जधारकाला त्याच्या कर्ज रकमेवर अर्जित व्याज दर अल्प टक्क्याचा असतो. कर्जफेडीचा कालावधी जितका दीर्घ, तितकं परताव्याचं वेळापत्रक आरामदायक ठरते. मात्र त्यामुळे कर्जाचे एकूण मूल्य वाढते.

स्वत:कडील वित्त साठ्याचा अंदाज घ्या आणि त्यासोबत मिळताजुळता कालावधी निवडा. त्याशिवाय, शक्य असेल त्यावेळी तुम्ही काही प्रमाणात कर्जाऊ रकमेचा परतावा करू शकता किंवा व्याजाची रक्कम वाचवण्यासाठी अवधीच्या अगोदर कर्ज फेडून टाकता येईल.

प्रक्रिया आणि दंड शुल्क

एखाद्या व्यक्तिने प्रक्रिया शुल्क आणि दंडाच्या रकमेचा आकार लक्षात घ्यावा. मालमत्तेच्या बदल्यात कर्जाकरिता साईन अप करण्यापूर्वी ते भरणा करण्यासाठी पात्र ठरू शकतात – ज्यामुळे कसलेही आश्चर्य वाटणार नाही.

सर्व कर्ज पुरवठादार मालमत्तेच्या बदली देण्यात येणाऱ्या कर्जावर प्रक्रिया शुल्क आकारतात आणि शुल्काचा दर कर्ज उपलब्ध करून देण्याऱ्या घटकानुरूप भिन्न असू शकतात. सामान्यपणे हा दर कर्ज रकमेच्या 6%* पर्यंत असू शकतो.

जाता-जाता

तुमच्या मुलांचा विवाह विधी असो किंवा त्याच्या/तिच्या परदेश गमनाची सोय, ज्यावेळी ठरावीक रकमेच्या निधीचा प्रश्न येतो, तेव्हा मालमत्तेच्या बदली कर्ज हा सुरक्षित आणि हाताशी असणारा पर्याय ठरतो. बजाज हाऊसिंग लिमिटेड ग्राहक-केंद्री संकल्पना उपलब्ध करून देतात आणि कर्ज इच्छुक व्यक्तिच्या वित्तीय गरजांभोवती फिरणारा कर्ज प्रवास सुलभ करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com