नीरव मोदीसह इतर दोघांची मालमत्ता होणार जप्त?

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नीरव आणि त्याचा भाऊ निशाल मोदी व सुभाष परब या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली आहे.

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील तब्बल 12 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी व अन्य दोन आरोपींच्या मालमत्तांवर जप्ती आणण्यासाठी सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला.

नीरव आणि त्याचा भाऊ निशाल मोदी व सुभाष परब या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली आहे. मोदीला सीबीआयने फरारी घोषित केले आहे. चौकशीला हजर राहण्याबाबत वारंवार समन्स बजावूनही आरोपींनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केल्याचे सीबीआयच्या वकिलांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Property of Nirav Modi Nishal Modi and Subhash Parab may Seized