मुंबई : मुंबईत सप्टेंबर महिन्यात सात हजार मालमत्तांचे रजिस्ट्रेशन (property registration) शक्य असल्याचा अंदाज मानांकन आणि वित्तसंस्थांनी व्यक्त केला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस च्या नुकत्याच दिलेल्या अहवालात हा अंदाज वर्तविला आहे. या सप्टेंबर महिन्यात रोज 300 मालमत्तांची नोंदणी होत होती. ऑगस्टमध्येही संख्या रोज 225 होती. सप्टेंबरमध्ये कोणतीही करसवलत (Tax) नसून तसेच मुद्रांक शुल्कात (stamp duty) सवलत नसूनही हा आकडा वाढत असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये (real estate) उत्साहाचे वातावरण आहे.
पितृपक्ष सुरु होईपर्यंत म्हणजे 20 सप्टेंबरपर्यंत मुंबईत 6,021 मालमत्तांची नोंद झाली होती. आता सप्टेंबरच्या उरलेल्या दिवसांमध्ये रोज 75 मालमत्तांची नोंदणी झाली तरीही सात हजारांचा आकडा गाठता येईल. गेल्या बारा वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात सात हजारांचा आकडा कधीच गाठला गेला नव्हता. यापूर्वी सन 2018 च्या सप्टेंबर महिन्यात 5,913 मालमत्तांची नोंदणी झाली होती. तो विक्रम या महिन्यात यापूर्वीच तोडल्याने बिल्डर उत्साही आहेत. सन 2012 च्या सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी म्हणजे एक हजार 66 मालमत्तांची नोंदणी झाली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.