‘टाटा स्काय’ची मराठी सिनेमा सेवा सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

पुणे - ‘टाटा स्काय मराठी सिनेमा’ ही नवी सेवा प्रथमच सादर करण्यात आली आहे. यामुळे सर्वोत्तम मराठी सिनेमे, गाणी आणि नाटके पाहता येणार आहेत. ‘टाटा स्काय मराठी सिनेमा’चे उद्‌घाटन मराठीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी ‘टाटा स्काय’चे चीफ कंटेंट ऑफिसर अरुण उन्नी आणि शेमरू एंटरटेन्मेंट लि.चे हिरेन गाडा आदी उपस्थित होते.

मराठी सिनेमांचा खजिना आता या सेवेवर उपलब्ध होईल, असे उद्‌घाटनाच्या वेळी स्वप्नील जोशीने सांगितले. ‘शेमरू’बरोबर भागीदारीत ही सेवा सादर करण्यात आली असून, याद्वारे ग्राहकांना १२० पेक्षा जास्त सिनेमे, ५०० गाणी आणि सर्वोत्तम अशी नाटके पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना दिवसभरात जाहिरातींच्या अडथळ्यांशिवाय तीन सिनेमे पाहता येतील. शिवाय दर रविवारी वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरचाही आनंद घेता येणार आहे.

Web Title: pune news business Tata Sky Marathi cinema