पंजाब नॅशनल बॅंकेचा खुलासा : थकीत कर्ज 25,000 कोटींवर!

पंजाब नॅशनल बॅंकेचा खुलासा : थकीत कर्ज 25,000 कोटींवर!

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या थकीत कर्जासंबंधी मोठाच खुलासा केला आहे. बॅंकेचे संपूर्ण देशातील एकूण थकीत कर्ज तब्बल 25,090.3 कोटी रुपयांवर पोचले आहे. यात 1,142 मोठ्या आणि इतर छोट्या कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. या 1,142 थकित कर्जदारांपैकी 1,108 कर्जदारांकडून 23,879.8 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची वसूली करण्याची प्रक्रिया पंजाब नॅशनल बॅंकेने सुरू केली आहे. त्यांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आले आहे. 

रिझर्व्ह बॅंकेला थकीत कर्जाची माहिती देणे बॅंकांना बंधनकारक आहे. त्यानुसार पंजाब नॅशनल बॅंकेनेसुद्धा आपल्या थकीत कर्जाची आणि कर्जदारांची माहिती रिझर्व्ह बॅंकेला दिली आहे. त्यातील काही कर्जे तर अनेक वर्षांपासून थकलेली आहेत. 

पंजाब नॅशनल बॅंक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, चंदीगढ, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधून बॅंकेची सर्वाधिक कर्जे थकलेली आहेत. यातील गंमतीशीर बाब म्हणजे ज्या कंपन्यांनी पंजाब नॅशनल बॅंकेकडून कर्ज घेतले आहे त्यांची नोंदणी परदेशात झालेली आहे किंवा ज्या कंपन्यांची नोंदणी भारतातच झाली आहे त्यांनी बॅंकेच्या परदेशातील शाखांमधून कर्जे उचलली आहेत. नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या मोठ्या कुप्रसिद्ध कर्जदारांव्यतिरिक्त बॅंकेच्या थकबाकीदारांची यादी जाते. या दोघांनी 14,000 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याने ते प्रसिद्धीस आले होते. बॅंकेच्या प्रमुख कर्जदारांची नावेही समोर आली आहेत. कुडोस केमी लि., चंदीगढ (1,301.8 कोटी रुपये), विनसम डायमन्ड्स अॅंड ज्वेलरी लि., सुरत (899.7 कोटी रुपये), जास इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर लि., कोलकाता (410.9 कोटी रुपये), झूम डेव्हलपर्स प्रा. लि., मुंबई (410.1 कोटी रुपये) अशी काही प्रमुख कर्जदारांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com