जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स  १३१.५२ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ८६५ अंशांवर बंद झाला. निफ्टीने ४० अंशांची कमाई केली आणि तो १० हजार ५१२ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी शेअर्सला मागणी होती.

चलनवाढ, औद्योगिक उत्पादनाच्या निराशाजनक कामगिरीकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष करीत खरेदी केली. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढीचा दर ५.१३ टक्‍क्‍यांपर्यंत गेला. ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादनाने मात्र तीन महिन्यांतील सुमार कामगिरी केली. औद्योगिक उत्पादन निर्देशांक ४.३ टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहिला. मात्र, या आकडेवारीचा फारसा परिणाम शेअर गुंतवणूकदारांवर झाला नाही. त्यांनी खरेदीचा सपाटा सुरूच ठेवला. आधीच्या सत्रात सेन्सेक्‍सने ७९२ अंशांची झेप घेतली होती. या सत्रात स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १ हजार २८७ कोटींचे शेअर खरेदी केले. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र १ हजार ३२२ कोटींची विक्री केली. 

इन्फोसिस, आयटीसी, ओएनजीसी, टीसीएस, सन फार्मा, एचडीएफसी बॅंक, विप्रो, रिलायन्स, टाटा मोटर्स, भारती एअरटेल आदी शेअर तेजीसह बंद झाले. हेल्थकेअर इंडेक्‍समध्ये सर्वाधिक २.२२ टक्‍क्‍यांची वाढ झाली. त्याखालोखाल आयटी इंडेक्‍स, टेक इंडेक्‍स वधारले. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

आशियातील इतर शेअर बाजारांवर मात्र जागतिक घडामोडींचा दबाव दिसून आला. जागतिक बाजारात कच्च्या तेलातील महागाईने उदयोन्मुख अर्थव्यवस्थांची आर्थिक घडी विस्कटणार आहे. आजच्या सत्रात जपान निक्केई, हाँगकाँग हॅंगसेंग, तैवान, कोरिया आदी शेअर बाजार घसरणीसह 
बंद झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purchasing Sensex