रेल्वेला "फ्लेक्‍सी फेअर'मधून 671 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न 

पीटीआय
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

रेल्वेमध्ये फ्लेक्‍सी फेअर पद्धती सप्टेंबर 2016 मध्ये लागू करण्यात आली. ही पद्धती राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यांसारख्या रेल्वेगाड्यांमध्ये सुरू करण्यात आली. ही पद्धती सुरू केल्यापासून नोव्हेंबर 2017 पर्यंत रेल्वेला 671 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे.

पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त 

नवी दिल्ली : राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यांसारख्या रेल्वेगाड्यांमध्ये "फ्लेक्‍सी फेअर'पद्धती सुरू केल्यापासून रेल्वेला 671 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती सरकारने शुक्रवारी दिली. 

"फ्लेक्‍सी फेअर' पद्धतीनुसार, रेल्वेतील दर दहा टक्के आसनांची तिकीट विक्री झाल्यानंतर तिकीटदर 10 ते 50 टक्के वाढतात. याविषयी राज्यसभेत लेखी उत्तरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन म्हणाले, की रेल्वेमध्ये फ्लेक्‍सी फेअर पद्धती सप्टेंबर 2016 मध्ये लागू करण्यात आली. ही पद्धती राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यांसारख्या रेल्वेगाड्यांमध्ये सुरू करण्यात आली. ही पद्धती सुरू केल्यापासून नोव्हेंबर 2017 पर्यंत रेल्वेला 671 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. रेल्वे आणि प्रवाशांचे हित लक्षात घेऊन "फ्लेक्‍सी फेअर' पद्धतीबाबत अभ्यास करण्यासाठी रेल्वेने नुकतीच एक समिती स्थापन केली आहे. ही समिती लवकरच याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. समिती रेल्वेला या भाडेपद्धतीबाबतचे अनेक पर्यायही सुचविणार आहे. त्यानंतर रेल्वेमध्ये सगळीकडे ही भाडेपद्धती वापरण्याचा विचार करण्यात येईल. 

Web Title: Railways earned additional Rs 671 crore through flexi fare