राकेश झुनझुनवाला खरेदी करणार 100 Boeing 737 मॅक्स एअरक्राफ्ट

राकेश झुनझुनवाला खरेदी करणार 100 Boeing 737 मॅक्स एअरक्राफ्ट

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या एअरलाईन्स अकासाची (Akasa) एअरक्राफ्ट बनवणारी अमेरिकन कंपनी बोईंगसोबत (Boeing) 100 737 मॅक्स एअरक्राफ्ट खरेदी करण्याबाबत बोलणी सुरु आहेत.

एअरलाइन्स बोइंगशी या खरेदीबाबत बोलणी करण्याबरोबरच सरकारसोबत एअरलाइन्स सुरु करण्याबाबत मंजूरी घेण्याच्या प्रयत्नात आहे, कंपनीने बोइंगच्या या विमानांना री-सर्टीफाय करण्यासाठी सरकारला अर्ज देण्यात आला आहे. (Finance News In Marathi)

राकेश झुनझुनवाला खरेदी करणार 100 Boeing 737 मॅक्स एअरक्राफ्ट
पुणे लोकलही होणार सुरु, मुंबई लोकलचे नियम लागू?

''बोइंग एअरक्राफ्ट भारतासहित सर्व देशांमध्ये ग्राउंडेड आहे. या विमानांना 2 अपघातानंतर ग्राउंडेड करण्यात आले आहे. 737 मॅक्सच्या प्रत्येक विमानाची किंमत जवळपास 10 कोटीच्या आसपास आहे'' असे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पण या विमानांना अनेकदा बाजारभावाच्या अर्ध्या किंमतींवर विकण्यात आले आहे. कंपनी याबाबत नियमकांशी बोलणे करते आहे. बोईंगसोबत या जहाजांच्या अधिग्रहणाबद्दल बोलणे सुरु आहे आणि ही बोलणी पुढे गेल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनी 2022 च्या सुरुवातीला व्यवसाय सुरु करण्याचे योजते आहे. त्यामुळेच सरकारला या एअरक्राफ्ट्सना नव्याने प्रमाणित (certify) करावे लागेल, पण अद्याप याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. आम्ही आमच्या वर्तमान आणि संभाव्य ग्राहकांशी त्यांच्या व्यावसायिक गरजांबाबत नेहमी संपर्कात असल्याचे बोइंगचे प्रवक्ते म्हणाले.

राकेश झुनझुनवाला खरेदी करणार 100 Boeing 737 मॅक्स एअरक्राफ्ट
पुण्यात तासाला एक सायबर गुन्हा

70 विमानांसोबत एअरलाइन्स सुरु करण्याची योजना असल्याचे राकेश झुनझुनवाला यांनी म्हटले. अकासामध्ये (Akasa) 3.5 कोटी डॉलरच्या गुंतवणुकीचा विचार असल्याचेही ते म्हणाले, ''राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे (Vinay Dube) यांच्यासोबत इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष (Aditya Ghosh) अकासाचे (Akasa) सहसंस्थापक असतील.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com