“रॅन्समवेअर’ हल्ल्याचा भारतात परिणाम मर्यादित

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

सरकारला मार्चपासून अतिदक्षतेचे इशारे मिळत आहेत. यामुळे आवश्‍यक सुरक्षा पॅचेस सरकारने बसवून महत्वाच्या नेटवर्कची सुरक्षा भक्कम केली आहे. यंत्रणेत व्यापक स्तरावर रॅन्समवेअरना परिणाम झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
- अरुणा सुंदरराजन, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव

माहिती तंत्रज्ञान सचिव सुंदरराजन यांची माहिती

नवी दिल्ली : "वॉनाक्रायरॅन्समवेअर' हल्ल्याचा परिणाम भारतात मर्यादित असून, अशा प्रकारच्या केवळ पाच ते सहा घटना उघडकीस आल्या आहेत. यातून भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन यांनी मंगळवारी दिली.

सुंदरराजन म्हणाल्या, ""सर्व तपास यंत्रणांचा समावेश असलेले पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सरकारची सायबर सुरक्षा संस्था "सीईआरटी'ने रॅन्समवेअरमुळे परिणाम झाल्याच्या केवळ पाच ते सहा घटना घडल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे भारतीय यंत्रणेला अद्याप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला नाही. आंध्र प्रदेश पोलिसांच्या 18 संगणकांवर परिणाम झाल्याच्या घटनेसह अन्य पाच घटना घडल्या आहेत. यात केरळमध्ये पंचायतींच्या संगणकांना फटका बसल्याचाही समावेश आहे. आतापर्यंतच्या या घटना एकेकट्या असून, व्यापक स्तरावर यंत्रणा बंद पडण्याच्या घटना घडलेल्या नाहीत.''

सरकारला मार्चपासून अतिदक्षतेचे इशारे मिळत आहेत. यामुळे आवश्‍यक सुरक्षा पॅचेस सरकारने बसवून महत्वाच्या नेटवर्कची सुरक्षा भक्कम केली आहे. यंत्रणेत व्यापक स्तरावर रॅन्समवेअरना परिणाम झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
- अरुणा सुंदरराजन, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव

Web Title: ransomware virus attack will have limited results in India