रतन टाटांचा राजीनाम्याचा विचार नाही: टाटा ट्रस्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई : टाटा सन्समध्ये 66 टक्के भागीदारी असलेल्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा रतन टाटा यांचा विचार नसल्याचे टाटा ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

मुंबई : टाटा सन्समध्ये 66 टक्के भागीदारी असलेल्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा रतन टाटा यांचा विचार नसल्याचे टाटा ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आले होते. रतन टाटा यांचे अत्यंत जवळचे विश्‍वासू सहकारी आर के कृष्णा कुमार यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत माहिती दिल्याचे वृत्त पसरले होते. या पार्श्‍वभूमीवर टाटा ट्रस्टने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. "टाटा ट्रस्टच्या यशस्वी नेतृत्वाची परंपरा भविष्यातही कायम राहावी आणि भविष्यातील नेतृत्त्व बदलाची प्रक्रिया सुरळितपणे पार पडावी या संदर्भात टाटा ट्रस्टच्या काही ट्रस्टींनी माध्यमासोबत चर्चा केली होती. टाटा ट्रस्ट अनेक उपक्रम राबवित असून त्याचा राष्ट्रीय परिणाम दिसून येतो. ट्रस्टच्या भविष्यातील उपक्रमांमध्येही रतन टाटा यांची सहभाग असेल. हे सारे भविष्यातही सुरळीतपणे सुरु राहावे याकडे त्यांचे लक्ष आहे.' असे टाटा ट्रस्टने कळविले आहे. मात्र सध्यातरी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा रतन टाटा यांचा कोणताही विचार नसल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

Web Title: Ratan Tata clarified that there are no plans for his stepping down from TATA trust