रतन टाटांची इन्स्टाग्रामवर एंट्री 

Ratan Tata joins Instagram
Ratan Tata joins Instagram

मुंबई: ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर खाते सुरू केले आहे. इन्स्टाग्रामवर खाते सुरू करत असल्याची माहिती टाटा यांनी ट्‌विटरवरून दिली. इन्स्टाग्रामवर येताच काही क्षणात टाटा यांना हजारो युजर्सनी फॉलो केले. मागील काही महिन्यांपासून टाटा नवउद्यमींमध्ये गुंतवणूक करत आहेत.

टाटा समूहातून निवृत्त झाल्यानंतर टाटा यांचा सार्वजनिक जीवनातील सक्रिय सहभाग कमी झाला होता, मात्र आता ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांमधून ते तरुणाईशी संवाद साधणार आहेत. आपल्याला इंटरनेटबाबत फारसे माहीत नाही, पण अतिशय वैविध्यपूर्ण असलेल्या या मंचावरील युझर्सशी नावीन्यपूर्ण चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे टाटा यांनी इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत टाटा यांना 3 लाख 45 हजार युझर्सनी फॉलो केले. सोशल मीडियावरील 2 लाख 46 हजार जणांनी ही पोस्ट लाईक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com