रतन टाटा देणार टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा राजीनामा?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - टाटा सन्समध्ये 66 टक्के भागीदारी असलेल्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत रतन टाटा यांचे प्रदीर्घ काळापासून अत्यंत जवळचे विश्‍वासू मित्र असलेले आर के कृष्णा कुमार यांनी माहिती दिली आहे.

टाटा ट्रस्टने अध्यक्षाच्या निवडीसाठी सल्लागार नियुक्त केल्याचेही वृत्त आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे टाटा ट्रस्टचा पुढील अध्यक्ष हा टाटा कुटुंबामधील नसेल असेही कुमार यांनी सांगितले आहे. मात्र, टाटा समूहाने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री कार्यरत असतानाही रतन टाटा यांचे टाटा सन्सवर नियंत्रण होते. आता मात्र, टाटा ट्रस्टचा राजीनामा दिल्यानंतर 79 वर्षे वय असलेले रतन टाटा अध्यक्षपदाचा कार्यभार नव्या अध्यक्षांकडे देऊन साऱ्या जबाबदाऱ्यातून मुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Ratan Tata likely to step down as chairman of Tata Trusts