‘रतन टाटा कंपूचे चोरीछुपे धोरण’

पीटीआय
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सायरस मिस्त्री यांना अयोग्य पद्धतीने व कोणतेही कारण न देता समूहाच्या अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर सतरा दिवसांनंतरही टाटा सन्सने स्पष्टीकरण दिलेले नाही. आता सूमहाने केलेले आरोप हे चुकीचे आणि अर्धसत्य आहेत. 
- सायरस मिस्त्रींचे निकटवर्तीय

मुंबई - टीसीएसच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी झालेली हकालपट्टी ही रतन टाटा आणि त्यांच्या कंपूचे चोरीछुपे धोरण उघड करणारी आहे, अशी प्रतिक्रिया मिस्त्री यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली. 

कंपनीच्या संचालक मंडळात ठराव संमत करण्याआधीच मिस्त्री यांना हटवून इशात हुसेन यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यातून रतन टाटा आणि त्यांच्या कंपूचे चोरीछुपे धोरण उघड होते. यात कोणतेही कायदेशीर प्रक्रिया त्यांनी अवलंबली नाही. टीसीएसच्या संचालक मंडळाची बैठक झाली नाही. त्यामुळे अध्यक्षांचे नाव सुचवून त्यावर संमती घेण्यात आली नाही. हे अतिशय घाईघाईने आणि तडकाफडकी करण्यात आले, अशी माहिती मिस्त्री यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली.

Web Title: Ratan Tata Policy