Ratan Tata : रतन टाटा यांनी शेअर केला 78 वर्षांचा फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाले, ते आनंदाचे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratan Tata

Ratan Tata : रतन टाटा यांनी शेअर केला 78 वर्षांचा फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाले, ते आनंदाचे...

Ratan Tata Instagram Post Viral : रतन टाटा 85 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. 157 वर्ष जुन्या व्यवसाय समूहाचे नेतृत्व करताना त्यांनी त्याला मोठ्या उंचीवर नेण्याचे काम केले. एक दिग्गज व्यापारी तसेच अतिशय उदार व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योग जगताची ओळख आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 78 वर्षांचा एक फोटो शेअर केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

रतन टाटा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे जुने ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करून जुन्या आठवणी परत ताज्या केल्या आहेत. या फोटोत त्यांच्या बालपणीची झलक दिसत असून त्यांच्यासोबत छोटा भाऊ जिमी नवल टाटाही आहेत.

देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्याचे दोन्ही भाऊ त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत दिसत आहेत. सायकलवर बसलेल्या कुत्र्यासोबत रतन टाटा आणि जिमी टाटा कॅमेराकडे हसत आहेत.

Ratan Tata

Ratan Tata

इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो 1945 मध्ये घेण्यात आला असून रतन टाटा यांनी हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. या फोटोला कॅप्शन देत लिहिले, 'ते आनंदाचे दिवस होते. आमच्यात दोघात कोणीही आले नाही. (माझा भाऊ जिमीसोबत 1945).' त्यांचा हा जुना फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Bank Loan : 'या' बँकेने दिला ग्राहकांना मोठा धक्का! दोन दिवसांनी महाग होणार कर्ज; जाणून घ्या नवे दर

जिमी टाटा रतन टाटा यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान :

लहान असलेले जिमी टाटा हेही साधेपणाचे उदाहरण आहे. रतन टाटा प्रमाणेच ते देखील अविवाहित आहेत आणि अतिशय साधे जीवन जगतात. रतन टाटा यांनी पोस्ट केलेल्या या जुन्या संस्मरणीय फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.