दर कपातीच्या शक्‍यतेमुळे शेअर बाजार वधारला!

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेकडून नोटाबंदीनंतर बुधवारी पहिला पतधोरण आढावा घेतला जाणार आहे. नोटाबंदीनंतर बॅंकांतील ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे बऱ्याच बॅंकांनी ठेवींवरील व्याजदर देखील कमी केले होते. आता बुधवारी होणाऱ्या बैठकीत रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल रेपोदरात 0.25 टक्के कपात करण्याची शक्‍यता वाढली आहे.

रिझर्व्ह बॅंकेकडून रेपोदरात 0.25 टक्के कपातीची शक्‍यता असल्याने शेअर बाजार वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सध्या (1 वाजून 02 मिनिटे) 113 अंशांनी वधारला असून 26,462.54 पातळीवर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 34 अंशांनी वधारला असून 8,162.35 पातळीवर आहे. पटेलांनी पहिल्या पतधोरण आढाव्यात रेपोदरात 0.25 टक्के कपात करून तो 6.25 टक्‍क्‍यांवर आणला होता. पतधोरण समितीच्या शिफारशीवर आधारित हे दुसरे पतधोरण असेल. जानेवारी 2015 पासून रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात 1.75 टक्के कपात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने 28 नोव्हेंबरला सीआरआर तात्पुरत्या स्वरूपात शंभर टक्‍क्‍यांवर नेला होता. बॅंकांतील वाढती जमा आणि व्याजदर यांचा मेळ साधण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून दरकपात होण्याची शक्‍यता अधिक आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये चलनावढ 4 टक्‍क्‍यांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ 3.39 टक्के, तर किरकोळ चलनवाढ 4.20 टक्के होती.

Web Title: Rate cutting possibility effect on share market