ATM कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; 30 सप्टेंबरपासून RBI चे नवे नियम

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. 30 सप्टेंबरपासून नवे नियम लागू होतील. 

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. 30 सप्टेंबरपासून नवे नियम लागू होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती गंभीर असल्यानं कार्ड देणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँकेनं 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. याआधी जानेवारीत हे नियम लागू होणार होते. 

आंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन व्यवहार, कॉन्टॅक्टलेस कार्डवरून व्यवहारासाठी ग्राहकांना त्यांचे वेगवेगळे प्राधान्यक्रम द्यावे लागतील. म्हणजेच ग्राहकांना ज्याची गरज आहे त्याचीच सेवा मिळेल. पण त्यासाठी आधी अर्ज करावा लागेल. 

रिझर्व्ह बँकेनं म्हटलं की, डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करताना आता ग्राहकांना घरेलू ट्रान्झॅक्शनची परवानगी द्यायला हवी. यानुसार गरज नसेल तर परदेशी ट्रान्झॅक्शनची परवानगी देऊ नये. 

हे वाचा - कोरोनाच्या संकटामुळे सरकारी बँकांवर दबाव वाढला - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सध्या ज्यांच्याकडे कार्ड आहेत त्याबद्दल बँकांनी जोखमीच्या जोरावर निर्णय घ्यावा. कार्ड देशांतर्गत व्यवहारासाठी हवं आहे की आंतरराष्ट्रीय याचा निर्णय ग्राहक करू शकतात. कोणती सेवा सुरु करायची आणि कोणती बंद हे सर्वस्वी ग्राहकाच्या म्हणण्यावर असणार आहे. 

हे वाचा - रॉयल एनफिल्डची Bullet 350 BS6 झाली महाग; जाणून घ्या नव्या किंमती

ग्राहकांना 24x7 सुरु असलेल्या ट्राऩ्झॅक्शनची मर्यादासुद्दा बदलू शकतो. म्हणजेच एटीएम कार्डच्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशिन, आयव्हीआर यांच्या माध्यामातून सेट करता येते. रिझर्व्ह बँकेचे हे नवे नियम 30 सप्टेंबरपासून लागू होतील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rbi change rule of debit and credit card from 30 September