Home Loan
Home LoanSakal

Home Loan : RBI च्या निर्णयामुळ गृहकर्ज महागलं; कर्जाच्या हप्त्यात होणार वाढ

देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या HDFC ने सलग तिसऱ्यांदा गृहकर्ज महाग केलंय
Summary

देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या HDFC ने सलग तिसऱ्यांदा गृहकर्ज महाग केलंय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो दर वाढीच्या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसत आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक आणि खाजगी बँकांसह गृहनिर्माण वित्त कंपन्याही व्याजदरात वाढ करत आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम ग्राहकांच्या EMI वर होत आहे. देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीने सलग तिसऱ्यांदा गृहकर्ज महाग केले आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सध्या सुरु असणाऱ्या गृहकर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार असल्याने ग्राहकांचे बचतीचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

Home Loan
Share Marketमध्ये अस्थिरता, आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये मोठी घसरण

HDFC बॅंकेने काल (ता. 8) गृहकर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआयच्या चलनविषयक धोरणाच्या घोषणेपूर्वीच एचडीएफसीने व्याजदरात 25 आधार अंकांनी वाढ केली होती. HDFC बॅंकेने RBI ने वाढवलेल्या रेपो दराचा संपूर्ण भार म्हणजेच 0.50 टक्के ग्राहकांवर टाकला आहे.

जर तुम्ही बॅंकेतून 15 लाख रुपयांचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी 7.90 टक्के दराने घेतले आहे. आणि त्यासाठी 12, 453 चा EMI भरावा लागत आहे. तर आताच्या पॉलिसीनुसार गृहकर्जावरील व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी वाढवल्यानंतर तुम्हाला 8.40 टक्के व्याजदरानुसार 12, 923 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. म्हणजेच दरमहा 470 रुपये आणि वर्षभरात 5640 रुपये असे अतिरिक्त पैसे ग्राहकाला मोजावे लागणार आहेत.

50 लाख रुपयांच्या गृहकर्जावर 8.25 टक्के व्याजाने 20 वर्षांसाठी 42, 603 ​​रुपयांचा ईएमआय भरायचा होता. परंतु गृहकर्जाच्या व्याजदरात 0.50 टक्के वाढ झाल्यानंतर गृहकर्जावरील नवीन व्याजदर 8.75 टक्के होईल. अशा ग्राहकाला 44,186 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 1, 583 रुपये अधिकचा EMI भरावा लागणार आहे. एका वर्षात तुमच्या बजेटवर 18, 996 रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

Home Loan
Gold-Silver Price: रक्षाबंधनच्या तोंडावर सोनं महागलं, जाणून घ्या नवे दर

RBI ने रेपो दर 1.40 टक्क्यांनी 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर हाऊसिंग फायनान्स कंपन्यांपासून बँकांपर्यंत कर्जे महाग होऊ लागली आहेत. महागड्या कर्जाचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांना सोसावा लागणार आहे. अलीकडच्या काळात बँक किंवा हाउसिंग फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेऊन त्यांचे घर विकत घेतले असलेल्यांना हा फटका बसणार आहे.

यासंदर्भात दिलासादायक बातमी ही आहे की, आगामी काळात महागाईचा दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर व्याजदर वाढण्याची प्रक्रिया थांबू शकते आणि आगामी काळात महागड्या कर्जांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com