RBI कडून मलकापूर को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध ; केवळ 10 हजार काढता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malkapur Bank

RBI कडून मलकापूर को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध ; केवळ 10 हजार काढता येणार

मुंबई : मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना खात्यातून केवळ 10 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नव्याने लावण्यात आलेले नियम बचत खाते आणि चालू खात्यांसाठी लागू असणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने निर्बंध लादण्यात आल्याचे आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. पुढील सहा महिन्यांपर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहे.

हेही वाचा: मोबाईलच ओळखेल बनावट नोटा, आरबीआय काय म्हणतेय...

आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय बँक कोणतेही कर्ज नव्याने रिन्यू तसेच कोणत्याच प्रकारची गुंतवणूक करू शकणार नाहीये. याशिवाय नवीन ठेवी किंवा कुणाकडून कर्ज घेणे, तसेच कोणतीही मालमत्ता विकण्यावरही आरबीआयकडून निर्बंध लावण्यात आले आहे. परिपत्रकात बँकेने त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असादेखील उल्लेख करण्यात आला आहे.

loading image
go to top