आता दोनशे रुपयांची नवी नोट येणार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

सरकारी मंजुरी मिळाल्यानंतर साधारणपणे जून महिन्यानंतर दोनशे रुपयांच्या नोटांच्या छपाईची प्रक्रिया सुरु होण्याचा अंदाज आहे, असे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.  

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक(आरबीआय) आता 200 रुपयांची चलनी नोट सादर करण्याची तयारी करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयच्या गेल्या महिन्यात पार पडलेल्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला आहे. याआधी सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालत दोन हजार रुपये मूल्याची चलनी नोट पहिल्यांदा सादर केली होती.  

सरकारी मंजुरी मिळाल्यानंतर साधारणपणे जून महिन्यानंतर दोनशे रुपयांच्या नोटांच्या छपाईची प्रक्रिया सुरु होण्याचा अंदाज आहे, असे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.  

याशिवाय, दहा रुपये मूल्याच्या नोटा छापण्याचे आरबीआयला निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहितीदेखील गेल्या महिन्यात समोर आली होती. त्यासाठी आवश्यक सामान खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला देशातील पाच ठिकाणी या नोटांचा प्रायोगिक तत्त्वांवर वापर केला जाणार आहे, असे अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत लेखी उत्तरात कळविले होते.

Web Title: RBI mum on new Rs 200 notes likely to be released after Centre's notification