असा असेल महाविकासआघाडीचा पहिला अर्थसंकल्प; वाचा स्पेशल रिपोर्ट

संजय मिस्कीन
Friday, 6 March 2020

सहा लाख युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार

मुंबई : राज्यात बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता आज शुक्रवार (ता.6) महाविकासआघाडीच्या अर्थसंकल्पात रोजगार देणारी महत्वकांक्षी योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील पाच वर्षात सहा लाख युवकांना रोजगार देणारी महत्त्वकांक्षी योजना अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्पातून जाहीर करतील अशी सूत्रांची माहिती आहे. 

राज्यभरातील तालुका व जिल्हा स्तरावर बेरोजगार युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण व रोजगाराची संधी निर्माण करून देणारी ही योजना असेल. यासाठी प्रत्येक युवकाला दरमहा सहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. या विद्या वेतनातून युवकाने कौशल्य विकासाच्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश देऊन त्याला रोजगारासाठी सक्षम करणे हा या योजनेचा मूळ हेतू आहे.

मोठी बातमी - मेघनाच्या मृत्यूचं गूढ उकललं, जिम ट्रेनरनेच दिलेलं...

सुरुवातीला या वर्षी साठी दोन लाख बेरोजगारांना संधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात असेल. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महा विकास आघाडीच्या तीन्ही राजकिय पक्षाने बेरोजगारी वरून भारतीय जनता पक्षाला लक्ष केले होते. नोटबंदी आणि जागतिक मंदी त्यातच जीएसटी च्या अंमलबजावणीनंतर राज्यातील रोजगाराचा आकडा खालवला होता. या पार्श्‍वभूमीवर बेरोजगार युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष देखील दिसत आहे. या बेरोजगारांना काम मिळावे यासाठी त्यांना सुरुवातीला कौशल्य विकासात च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. सरकारच्या या योजनेसाठी दरमहा नऊ हजाराचा खर्च अपेक्षित असताना लाभार्थी युवकाला सहा हजार रुपये दरमहा सरकार देणार आहे. तर तीन हजार रुपये युवकाने खर्च करणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोठी बातमी -  कसाबला पकडणाऱ्या 'तुकाराम ओंबळेंना' पदोन्नती.. गृहमंत्र्यांची माहिती 

दरम्यान अर्थसंकल्पात राज्यावरील वाढते कर्ज, घटणारी गुंतवणूक आणि विविध विकास प्रकल्पांसाठीचा अपुरा निधी यावर विशेष योजना जाहीर होतील असे मानले जाते.

maharashtra state budget will be tabled tomorrow special report 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state budget will be tabled tomorrow special report