गेल्या 15 वर्षांत रुपयाचं खरं मूल्य स्थिर; RBI चा अभ्यासाद्वारे निष्कर्ष

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

या आकडेवारीतून भारताची बाहेरच्या इतर देशांशी असलेली चांगली व्यापारी स्पर्धा प्रतिबिंबित होत असल्याचा हा अभ्यास सांगतो. 

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने 21 जानेवारी रोजी आपलं मासिक बुलेटीन जाहीर केलं आहे. यामध्ये एक भाषण, चार लेख आणि वर्तमान आकडेवारी समाविष्ट आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती, भारतीय रुपयांचा प्रभावी विनिमय दर सूचकांक, लघु वित्त बँक: आर्थिक समावेश आणि व्यवहार्यता संतुलित करणे आणि भारतातील हरित वित्त: प्रगती व आव्हाने या विषयांवर लेख आहे. 

यातील भारतीय रुपयांचा प्रभावी विनिमय दर सूचकांकांवर (The real effective exchange rate - REER) रिझर्व्ह बँकेने एका अभ्यासाचा निष्कर्ष जाहीर केला आहे. यानुसार, भारतीय चलन रुपयाच्या The real effective exchange rate (REER) संदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. गेल्या 15 वर्षात REER रेट हा 100 अंकांच्या आसापस राहिला आहे. या आकडेवारीतून भारताची बाहेरच्या इतर देशांशी असलेली चांगली व्यापारी स्पर्धा प्रतिबिंबित होत असल्याचा हा अभ्यास सांगतो. 

हेही वाचा - Gold Price - सोन्यासह चांदीचे दरही वाढले; जाणून घ्या आजचे भाव

लवचिक चलनफुगवट्याचे ध्येय (FIT framework) स्विकारल्यापासून भारताच्या इतर देशांशी असलेल्या बाह्यस्पर्धेमध्ये चांगले स्थान मिळाले आहे. त्यामुळे भारत आणि इतर व्यापारी देशांमधील महागाईतील फरक कमी झाला आहे तसेच तो स्थिर झाला आहे.
पुढे रिझर्व्ह बँकेने आकडेवारीमध्ये सांगितलंय की, 2016-17 ते 2019-20 या कालावधीत नवीन REER  सरासरीच्या 0.8 टक्क्यांपेक्षा जास्त होता. FIT च्या कारकिर्दीत मध्यम महागाई दिसून येते.

भारतीय अर्थव्यवस्थेत स्ट्रक्चरल बदल आणि भारताच्या परदेशी व्यापार वॉरंट अपडेटच्या पध्दतीत बदलांमुळे भारतीय रुपयांमध्ये नाममात्र / वास्तविक प्रभावी विनिमय दराच्या (NRRE / REER)  विस्तृत (विद्यमान 36-चलन-आधारित) निर्देशांकात विकास करण्याची आवश्यकता दर्शवितात.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI study says Rupees real value stable & showing better external competitiveness