'त्या' अधिकाऱ्याचे 'RBI'कडून त्वरीत निलंबन

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

बंगळूर : सीबीआयच्या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेला रिझर्व्ह बँकेचा (RBI) अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती RBI चे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

बंगळूर : सीबीआयच्या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेला रिझर्व्ह बँकेचा (RBI) अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती RBI चे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

हा कनिष्ठ पातळीवरील कर्मचारी असल्याचे मुंद्रा यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी तपास सुरू झाला असून, तपशील हातात आल्यानंतर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
सीबीआयने रिझर्व्ह बँकेच्या बंगळूर येथील शाखेत कारवाई केली असून के. मायकल या विशेष सहायकास बेकायदेशीररित्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणी सीबीआयने आणखी दोन लोकांना देखील अटक केली असून त्यांच्याकडून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

अनेक बँक शाखांमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी लोकांना नोटा बदलून दिल्याचा गैरप्रकार केल्याच्या बातम्यांविषयी बोलताना ते म्हणाले की, नोटाबंदीनंतरचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या संपुर्ण प्रक्रियेत सर्वच बँक कर्मचाऱ्यांनी खुप परिश्रम घेतले आहेत. जरी काही घटकांनी अपेक्षेपेक्षा वेगळ्या हालचाली सुरु केल्या आहेत परंतु आम्ही त्यांच्यावर अंकुश ठेऊन आहोत.
 
Web Title: RBI suspends the arrested official