आता एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकेवर होणार कारवाई

वृत्तसंस्था
Friday, 14 June 2019

- एटीएममध्ये पैसे नसल्याचे अनेक प्रकार आले समोर.

नवी दिल्ली : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर अनेकदा रक्कम नसल्याचे फलक एटीएम मशिन्सवर दिसत असतात. त्यामुळे संबंधित खातेदाराला रक्कम न मिळाल्याने निराशा होत असे. मात्र, आता एटीएममध्ये रक्कम नसल्यास संबंधित बँकेवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 

इंग्रजी वेबसाईट झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले. एटीएममध्ये रक्कम नसल्याचे प्रकार अनेकदा घडतात. पण ही रक्कम पुन्हा भरण्यासाठी काही तासांचा कालावधी जातो. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत दिले. आरबीआयने अशा एटीएममध्ये रक्कम पूर्णपणे रिकामी झाल्यास तीन तासांमध्ये पुन्हा भरावी, असे सांगितले आहे. मात्र, संबंधित बँकेने असे न केल्यास त्या बँकेवर विभागनिहाय दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.  

दरम्यान, छोटी शहरं आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना एटीएममधील रकमेचा आवश्यक पुरवठा न झाल्याने एटीएम पैशांविना काही दिवसांपासून बंद पडलेली असतात. आरबीआयच्या या नव्या नियमामुळे सर्व बँक खातेदारांना याचा फायदा होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI tightens noose around banks to impose penalty for keeping ATMs dry