सावधान! जुन्या नोटा आणि नाण्यांची खरेदी-विक्री करताय? RBI ने दिला इशारा

RBI
RBISakal

RBI Alert : भारतीय रिझर्व बँकेने (RBI) जुन्या नोटा आणि नाणी खरेदी विक्री करण्याबाबत लोकांना सावधान केले आहे. मार्केट आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दिल्या जात असलेल्या ऑफर्सबाबत सतर्क राहण्याचा इशारा आरबीआयने दिला आहे. काही लोक रिझर्व बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) नाव आणि लोगोचा (RBI Logo) चुकीचा वापर करत आहेत. सोबतच ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि मार्केटच्या माध्यमातून जुने बँक नोट्स आणि नाण्यांची खरेदी विक्रीवर लोकांकडून फी, कमिशन आणि टॅक्सची मागणी करत आहेत.

पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अशा कोणत्याही बाबतीत सहभाग नाही, शिवाय कोणतीही फी किंवा कमिशनही घेतले जात नसल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले. (buying selling of old notes and coins) जुन्या बँक नोटा आणि नाण्यांच्या खरेदी – विक्रीवर फी आणि कमिशनच्या वसूलीसाठी कोणताही अँटिटी, कंपनी आणि व्यक्तीलाही अधिकार दिला नसल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली.

RBI
मागण्यांसाठी रिक्षाचालकांचा टाहो

नोटा आणि नाणी खरेदी-विक्रीचा चुकीचा वापर

'RBI ने आपल्या पब्लिक स्टेटमेंटमध्ये लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. (Fraud Selling of old Notes and Coins) यांसारख्या फ्रॉड ऑफर्सपासून सावधान राहा. काही लोक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाव घेऊन तुम्हाला फसवत असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

जुन्या नोटा आणि नाणी खरेदी – विक्री करणाऱ्यांनी लक्ष द्या...

(RBI Logo) पाहून फसू नका असेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँक तुमच्याकडून कोणतीही फी, कमिशन, चार्ज किंवा टॅक्स घेत नाही असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच असे कमिशन किंवा फी घेण्याचा अधिकारही कोणालाही दिला गेला नाही आहे. अशा कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका आणि स्वतःचे नुकसान करु नका असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांचा फ्रॉड बिझनेस सुरु आहे आणि या बदल्यात बरेच पैसे उकळले जात आहेत. तुम्ही याला बळी पडू नका असे आवाहन रिझर्व बँक ऑफ इंडियाने नागरिकांनाो केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com