रिलायन्स-एअरसेल करारास सेबीचा हिरवा कंदील

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

नवी दिल्ली: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपल्या 'वायरलेस' व्यवसायाचे एअरसेलसोबत विलीनीकरण करण्यासाठी भांडवली बाजार नियामक 'सेबी' आणि दोन्ही प्रमुख शेअर बाजारांची मंजुरी मिळाली आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपला वायरलेस विभाग एअरसेल लि. आणि डिशनेट वायरलेस लि.सोबत विलीन करण्यास भांडवली बाजार नियामक 'सेबी', मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची मंजुरी मिळाली आहे. आता कंपनीने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे(एनसीएलटी) यासाठी मंजुरी मागितली आहे. या करारासाठी आणखी काही नियामक परवानग्या आवश्यक आहेत., असे कंपनीने शेअर बाजारात सादर निवेदनात म्हटले आहे.

यासंबंधी घोषणेनंतर रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअरमध्ये इंट्राडे व्यवहारात सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारात आज(बुधवार) कंपनीचा शेअर 36.45 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 36.25 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 38.15 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(1 वाजून 22 मिनिटे) कंपनीचा शेअर 37.00 रुपयांवर व्यवहार करत असून 2.07 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: RCom-Aircel merger gets SEBI nod