पेमेंट बॅंकेत पैशांची गुंतवणूक करण्याआधी ही बातमी नक्की वाचा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 6 September 2020

भारतात पेमेंट बॅंकेची सुरुवात 2015 मध्ये झाली होती.

भारतात पेमेंट बॅंकेची सुरुवात 2015 मध्ये झाली होती. देशातील बॅंकींग सेवेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी पेमेंट बॅंकाची सुरुवात केली होती. पेमेंट बँक सुरू करण्याचा मुख्य हेतू म्हणजे लहान बचत खातेदार, असंघटित क्षेत्रातील स्थलांतरित कामगार, कमी उत्पन्न असणारी कुटुंबं आणि छोटे व्यापारी यांना बँकिंग सेवांशी जोडणे हा आहे.  पेमेंट बँकेच्या सेवींग डीपॉसीट स्वीकारले जाते यामुळे आपण त्याचा व्यवहारात वापर करू शकतो.  महत्वाचे म्हाणजे पेमेट बँका कर्ज देत नाहीत. तिथं ग्राहकांना मुदत ठेव खातीही (फिक्स्ड डिपॉजिट) उघडत नाहीत.

सध्या भारतात बऱ्याच पेमेट बॅंका असून त्यांचा मोठा फायदाही सामान्यांना होत आहे. काही दिवसांपुर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एक माहिती दिली होती. यामध्ये 'आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँके'चा बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट अंतर्गत बँकिंग कंपनीचा दर्जा कार्यकाल संपला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आरबीआयने म्हटले होते की आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने स्वेच्छेने हा व्यवसाय संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता ग्राहकांनी या बॅंकेत पैश्याची गुंतवणूक करणे धोकादायक ठरु शकतं. 

सलाम! रुग्णसेवेसाठी धावला वर्दीतला डॉक्टर; पोलिस अधीक्षकाने जिंकली मने

देशात बँकिंग क्षेत्राचं जाळं वाढवण्यासाठी आरबीआयने काही कंपन्यांना बँकिंग सेवेचे परवाने दिले होते. यामध्ये आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बॅंकेचा सामावेशही होता, ज्याचा आता परवाना संपला आहे.

 पेमेंट बँक म्हणजे काय-

 ठेवीची जास्तीत जास्त मर्यादा किती आहे - या बँकांमध्ये जमा करण्याची कमाल मर्यादा 1 लाख रुपये आहे.  पेमेंट बँका सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करु शकतात.  ते मुख्य प्रवाहातील बँकांच्या बँक खात्यात 25 टक्के पर्यंत जमा करू शकतात.या बँकांमध्ये पैसे जमा करून ग्राहकांना चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.  ते डेबिट कार्ड आणि चेक बुक सारख्या सर्व सुविधा देखील उपलब्ध करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: read this news before investing money in a payment bank