
https://www.esakal.com/arthavishwa/gopal-galgali-write-article-sharemarket-ups-and-downs-393335डीसीजीआयने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या लशींना औपचारिक मंजुरी दिल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे.
मुंबई- डीसीजीआयने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या लशींना औपचारिक मंजुरी दिल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. मुंबई शेअर बाजाराने विक्रमी उसळी घेतली असून सेन्सेक्स पहिल्यांदाच 48 हजार अंकाच्या पुढे गेला आहे. तर निफ्टीनेही पहिल्यांदाच 14 हजारांचा पल्ला गाठला. सेन्सेक्सची सुरुवातच 206 अंकाच्या उसळीने झाली. सध्या सेन्सेक्स 48,076 अंकांवर तर निफ्टी 14,089 अंकावर आहे.लशीमुळे कोरोनाचा प्रभाव ओसरेल अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहेत.
हेही वाचा- शेअर म्हणजे लॉटरीचे तिकीट नव्हे!
Sensex up 206 points in opening trade, currently at 48,076; Nifty at 14,089 pic.twitter.com/RWf6YjeOqd
— ANI (@ANI) January 4, 2021
ओएनजीसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक 2.58 टक्क्यांची तेजी आहे. त्याचबरोबर टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आणि टेक मंहिद्रामध्येही तेजी दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोटक बँकेत सर्वाधिक 0.57 टक्क्यांची घसरण दिसून येते. कोटकशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन आणि एशियन पेंट्सचे शेअरही घसरले आहेत.
हेही वाचा- तेजी-मंदीचा हेलकावा
गेल्या शुक्रवारी सेन्सेक्स 117.65 म्हणजेच 0.25 अंकांनी वाढून 47,868.98 अंकांवर पोहोचून आपल्या सार्वकालिक उच्च स्तरावर बंद झाला होता. निफ्टीही 14,018.50 या सार्वकालिक उच्च स्तरावर बंद झाला होता.