लीभेरच्या रेफ्रिजरेटरची भारतीय बाजारपेठेत एंट्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई - रेफ्रिजरेटर निर्मिती क्षेत्रातील आघाडीची जर्मन कंपनी लीभेरने रेफ्रिजरेटरची विस्तृत श्रेणी बाजारात आणली आहे. या रेफ्रिजरेटर्सची किंमत २३ हजार ५०० रुपयांपासून दीड लाखापर्यंत आहे. कंपनीच्या औरंगाबाद येथील प्रकल्पातून रेफ्रिजरेटरची निर्मिती करण्यात आली आहे. तीन वर्षांच्या संशोधनानंतर या उपकरणामधील जर्मन तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेस लागू पडले आहे. कंपनीने २२० लीटर क्षमतेपासून ४४२ लीटर क्षमतेपर्यंतचे १९ प्रकारचे रेफ्रिजरेटर्स बाजारात आणले आहेत.

या रेफ्रिजरेटर्समध्ये ‘सेंट्रल पॉवर कूलिंग’ तंत्रज्ञान वापरले आहे, असे लीभेरचे मुख्य विपणन अधिकारी राधाकृष्ण सोमय्याजी यांनी सांगितले. ५० हून अधिक शहरे आणि ५०० शोरूममध्ये रेफ्रिजरेटर मिळतील. लीभेरने कायमच ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्यावर भर दिला आहे. कंपनीने जर्मन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडीला साजेसे असे रेफ्रिजरेटर्स भारतीय बाजारपेठेत आणले आहेत. हे रेफ्रिजरेटर्स उत्कृष्ट स्पाइकबॉक्‍सेस, अल्ट्रा प्रोटेक्‍टिव्ह व्हेरिओसेफ, युनिक कुलपॅक या फिचर्सने नटले आहेत. यात भाज्यांची विभागणीदेखील करता येणे शक्‍य आहे. या रेफ्रिजरेटर्ससाठी विजेचा कमीत कमी उपयोग केला जातो, असे सोमय्याजी यांनी सांगितले.

Web Title: Refrigerator entry into the Indian market