डॅट्‌सन गो आणि गो प्लस सीव्हीटीसाठी नोंदणीला सुरुवात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

डॅट्‌सन गो आणि गो प्लस या गाड्यांच्या सीव्हीटी आवृत्तीसाठी नोंदणीला सुरुवात केल्याची घोषणा निसान इंडियाने केली आहे.

नवी दिल्ली : अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा अंतर्भाव, धडक आणि पादचारी संरक्षण, वेगानुसार ऑटो डोअर लॉक, व्हीडीसी, दोन एअरबॅग्ज असणाऱ्या 
डॅट्‌सन गो आणि गो प्लस या गाड्यांच्या सीव्हीटी आवृत्तीसाठी नोंदणीला सुरुवात केल्याची घोषणा निसान इंडियाने केली आहे.

निसान आणि डॅट्‌सनच्या देशभरातील कोणत्याही शोरूममध्ये डॅट्‌सन गो सीव्हीटी आणि गो प्लसची नोंदणी ग्राहक अवघे 11 हजार रुपयांची आगाऊ रक्कम भरून करून शकतात. ही आगाऊ रक्कम पूर्णतः परताव्यासाठी पात्र आहे. निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले, देशभरातील ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही निसानचे सीव्हीटी हे तंत्रज्ञान डॅट्‌सन गो आणि गो प्लसच्या माध्यमातून भारतात आणत आहोत. स्पेस, सेफ, स्मार्ट, स्टाइल आणि शुअर (जपानी तंत्रज्ञान) असे पाच एस हे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या या श्रेणीतल्या डॅट्‌सन गो सीव्हीटी आणि गो प्लस सीव्हीटी या पहिल्याच गाड्या आहेत. श्रेणीतल्या या सर्वोत्तम वैशिष्ट्यांमुळे ग्राहक निश्‍चितपणे आनंदी होतील, असा आमचा विश्‍वास आहे. 

web title : Registration for Datsun Go and Go Plus CVT


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration for Datsun Go and Go Plus CVT

टॅग्स