माजी प्रमुखांसह अधिकाऱ्यांवर ठपका

पीटीआय
मंगळवार, 15 मे 2018

नवी दिल्ली - हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरपेक्षा अधिक रकमेचा देशातील सर्वांत मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने आज पहिले आरोपपत्र दाखल केले. 

आरोपपत्रामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) माजी प्रमुख उषा अनंतसुब्रह्मण्यन यांच्या कथित भूमिकेचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईस्थित विशेष न्यायालयात दाखल आरोपपत्रामध्ये पीएनबीच्या अनेक अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात के. व्ही. ब्रह्माजी राव तसेच संजीव शरण या कार्यकारी संचालकांसह महाव्यवस्थापक निहाल अहद यांचीही नावे घेतली आहेत. नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी तसेच त्याच्या कंपनीत  कार्यकारी म्हणून कार्यरत सुभाष  परब यांच्या भूमिकांचाही सविस्तर उल्लेख आहे. 

Web Title: Rejecting officer with former heads